Sleeping Competition 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Sleeping Competition 2024 : झोप काढा, लखपती बना ! स्पर्धा जिंकत तरुणीने कमवले ९ लाख रुपये

Ruchika Jadhav

झोप काढा आणि लखपती व्हा या मजेशीर स्पर्धेत एका तरुणीने तब्बल 9 लाख रुपये कमावलेयत. निवांत झोपायचं आणि पैसे कमावायचे ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत बंगळुरूतील साईश्वरी पाटीलने 9 लाख रुपये कमावलेत. स्पर्धकाला प्रत्येक रात्री 8 ते 9 तास झोपायला आणि दिवसा 20-मिनिटांची पॉवर नॅप्स घेण्यास प्रोत्साहित करण्यात आलंय. ही स्लीप चॅम्पियन स्पर्धा काय आहे पाहुयात.

झोप काढा, 9 लाख मिळवा

वेकफिट नावाच्या स्टार्टअप कंपनीकडून स्लीप चॅम्पियन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. बेंगळुरूतील साईश्वरी पाटीलसह 11 स्पर्धकांची स्लीप इंटर्न म्हणून निवड झाली होती. वेकफिट स्टार्ट-अपच्या पहिल्या स्लीप इंटर्नशिप प्रोग्रामचा हा तिसरा सीझन होता. लोकांना चांगली झोप मिळावी आणि काही कारणांमुळे झोप येत नाही त्यांना प्रोत्साहन द्यावे असा या मागचा उद्देश होता.

दिवसभरात 20 मिनिटांची पॉवर डुलकी घेण्यास प्रोत्साहन

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी, सर्व सहभागींना प्रीमियम दर्जाची गादी आणि कॉन्टॅक्ट-लेस स्लीप ट्रॅकर देखील देण्यात आला. पुरेशी झोप होत नसल्याने जीवनशैलीवर परिणाम होतो.

सोशल मीडिया स्क्रोलिंगचा लोकांच्या झोपेच्या चक्रावर परिणाम झालाय. झोप चांगली असेल तर आरोग्य चांगलं राहतं असं म्हणतात, त्यामुळे झोपेचं महत्त्व समजून देण्यासाठी आणि लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

सध्या सोशल मीडियावर या स्पर्धेची आणि यात विजय मिळवलेल्या तरुणीची तुफान चर्चा सुरू आहे. झोपण्याची स्पर्धा ऐकून महाराष्ट्रातील अनेक नेटकऱ्यांनी यावर हस्स्यास्पद इमोजी पोस्ट केलेत. तसेच येथे देखील ही स्पर्धा घ्यावी अशी मागणी केली आहे.

अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर होणारे परिणाम

झोप पूर्ण न झाल्यास आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो. व्यक्तीमधील चिडचिडेपणा जास्त वाढतो. झोप पूर्ण न झाल्यास पोट साफ होत नाही. बद्धकोष्ठताचा त्रास होतो. त्यासह चेहऱ्यावर पुरळ, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे या समस्या उद्भवतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: येवल्यात छगन भुजबळांना कुणाचं आव्हान? मविआची काय आहे रणनीती? वाचा...

Maharashtra Politics : अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार? पाहा स्पेशल रिपोर्ट,VIDEO

Dussehra Melava: बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे; मनोज जरांगे- मुंडे आमनेसामने

Darbhanga Express Acccident: तामिळनाडूमध्ये रेल्वे अपघात; दरभंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली

Dasara Melava 2024 : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर धडाडणार, राज ठाकरे ऑनलाईन गरजणार; कोणावर निशाणा साधणार? VIDEO

SCROLL FOR NEXT