घरात सुख-शांती नांदावी यासाठी अनेक जण वास्तू शास्त्राची मदत घेतात. वास्तू शास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीची एक विशेष जागा ठरवून देण्यात आली आहे. वास्तू शास्त्राच्या नियमानुसार, रात्री झोपताना काही गोष्टी आपल्या आजूबाजूला ठेऊ नयेत.
झोप ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा काळ असतो. वास्तुशास्त्रानुसार, झोपताना पलंगावर ठेवलेल्या वस्तूंचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे बेडजवळ अशा काही वस्तू ठेवल्यास तुम्हाला लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते. जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार, झोपताना पलंगावर कोणत्या गोष्टी ठेवणं टाळाव्यात.
आपल्यापैकी काही जण पर्स किंवा वॉलेट कुठेही ठेऊन मोकळे होतात. अशातच झोपताना उशीजवळ पैसे किंवा पर्स ठेवणं टाळलं पाहिजे. पर्स किंवा पैसे ठेवल्याने लक्ष्मीचा अपमान होतो असं मानण्यात येतं.
सोन्या-चांदीचे दागिने कधीही डोक्याजवळ ठेवू नयेत. असं म्हटलं जातं की, बेडजवळ दागिने ठेवल्याने लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते. याशिवाय तुमच्या करियरमधील प्रगतीतही अडथळा येऊ शकतो.
तुमच्या बेडजवळ लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवल्याने व्यक्तीला नकारात्मकतेचा सामना करावा लागू शक्यता असते. या काळात घरात भांडणं होण्याची शक्यता वाढते.
रात्री घेण्यात येणारी औषधं आपण विसरू नये यासाठी काही जण बेडजवळ किंवा उशा जवळ औषधांचा डबा ठेवतात. झोपताना बेडजवळ औषधे ठेवल्यामुळे वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही असं करत असाल तर आजच ही सवय बदला.
वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या चपला किंवा शूज बेडजवळ ठेवू नये. यामुळे जीवनात नकारात्मकता येते. याशिवाय तुमच्या घरात गरिबी येण्याचा धोका असतो.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.