आजवर तुम्ही विविध स्पर्धा पाहिल्या असतील. कामाच्या ठिकाणी उत्तम परफॉर्मन्स करण्याची स्पर्धा, त्यानंतर कब्बडी, क्रिकेट, खो-खो अशा विविध खेळांसाठी स्पर्धा घेतल्या जातात. तर काही ठिकाणी पक्षांच्या आणि प्राण्यांच्या सुद्धा स्पर्धा होतात. आता तुम्ही देखील विविध प्राण्यांच्या आणि पक्षांच्या स्पर्धा पाहिल्या असतील. यात बौलांची शर्यत, कबुतरांची स्पर्धा होताना दिसते. मात्र तुम्ही कधी खेकड्यांची शर्यत पाहिली आहे का?
सध्या सोशल मीडियावर या अतरंगी स्पर्धेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. कारण येथील तरुणांनी चक्क पावसाळ्यात येणारे खेकडे म्हणजेच चिंबोऱ्या पकडल्या आहेत. तसेच त्यांना धागा बांधून मोठी स्पर्धा भरवली आहे. स्पर्धेत अनेक तरुण आपल्या खेकड्याला घेऊन सहभागी झालेत. आपल्या खेकड्याचा पहिला नंबर यावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मैदानात चार मुलं स्पर्धेत उतरली आहेत. त्यांनी आपल्या हातात खेकडे पकडलेत. आता स्पर्धेमध्ये खेकडा धावत असताना यांना त्याला हात लावायचा नाही असा नियम आहे. त्यामुळे स्पर्धा सुरु होताच सर्वजण आपल्या खेकड्यांना जमिनीवर ठेवतात आणि मागून पानांच्या सहाय्याने त्यांना पुढे जाण्यासाठी किंवा ते पळण्यासाठी त्यांना घाबरवतात.
व्हिडिओ पाहून समजत आहे की, ही स्पर्धा कोकणातील आहे. @Roshanbharane या फेसबूक अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळा सुरू झाला की, मातीत आणि खडकांखाली जमिनीच्या आतमध्ये असेले खेकडे बाहेर पडतात. आता सुद्धा असे खेकडे बाहेर पडले आहेत. अनेक ठिकाणी बाजारात खाण्यासाठी खेकडे विकले जात आहेत.
पावसाळ्यात अनेक लहान आणि तरुण मुलं खेकडे पकडण्यासाठी जातात. आता स्पर्धेत असलेल्या या मुलांनी सुद्धा स्वत: खेकडे पकडून आणलेत. खेकड्यांच्या या व्हिडिओ आता लाखोंच्या घरात लाईक्स मिळाले आहेत. तसेच यावर अनेक हसण्याचे इमोजी सुद्धा आले आहेत. ही अनोखी स्पर्धा पाहून आता अन्य काही ठिकाणी सुद्धा अशी स्पर्धा होऊ शकते, असं कही नेटकरी म्हणत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.