Pregnancy Skin Problem Saam Tv
लाईफस्टाईल

Pregnancy Skin Problem: प्रेग्नेंसीमध्ये तुमची स्किन देखील खराब झालीये? अशी घ्या काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आई होणे हा जगातील सर्वात सुंदर अनुभव आहे. प्रत्येक आई आपल्या लहान बाळासाठी अनेक गोष्टी करते. गरोदरपणाच्या नऊ महिन्याच्या काळात महिलेच्या शरीरात खूप बदल होत असतात. हा काळ आईसाठी आव्हानात्मक असतात. अनेकदा आईला त्रास होतो. परंतु नवीन पाहुण्याच्या आगमनासाठी आई खूप खुश असते. गरोदरपणात सतत मूड बदलणे, बजन वाढणे, सूज येणे अशा समस्या होतात. गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर त्वचेशीसंबंधित अनेक समस्या होतात. या समस्यांपासून वाचण्यासाठी काळजी घ्यायला हवी.

प्रसूतीनंतर शरीरातील हार्मोन्स बदलत असतात. त्यामुळे त्वचेवर परिणाम होतो. प्रसूतीनंतर चेहऱ्यावर पुरळ,कोरडी त्वचा, डाग येतात. प्रोजेस्टेरॉनच्या पातळीतील असंतुलनामुळे चेहऱ्यावर मुरुम येऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी तुम्ही चेहरा नियमितपणे स्वच्छ धुवायला हवा. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतात.

प्रसूतीनंतर इस्ट्रोजेनमध्ये घट झाल्याने शरीराची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी क्षमता कमी पडते. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो. त्यामुळे पुरेसे पाणी प्या. आहारात नारळ पाणी, ताज्या फळांचा रस यांचा समावेश करा. त्याचसोबत आहारात फळांचा,ड्रायफ्रुट्सचा समावेश करा.

मेलास्मा म्हणजे त्वचेवर तपकिरी आणि राखाडी ठिपके येतात. गर्भधारणेदरम्यान प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनमध्ये अचानक वाढ झाल्याने ही समस्या होते. त्यापासून वाचण्यासाठी तुम्ही हेल्दी जेवण, पुरेसे पाणी प्यायला हवे.

Disclaimer- वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT