Beetroot chia drink for clear and glowing skin Freepik
लाईफस्टाईल

Glowing Skin Drink : घरच्या घरी चमकदार त्वचा मिळवायची आहे? मग बीट आणि चियासीड्सचे हे हेल्दी ड्रिंक नक्की ट्राय करा

Beetroot and chia seeds drink for glowing skin : बीटमरूटमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि चियासीड्समधील ओमेगा-३ त्वचेला चमकदार, निरोगी आणि हायड्रेटेड ठेवायला मदत करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकाला वाटत असतं की, आपलीही त्वचा चित्रपटातील एखाद्या सुंदर अभिनेत्री सारखी असावी. यासाठी अनेक महागडे स्किन केअर प्रोडक्ट्स, औषधे, स्किन ट्रिटमेंट्स, घरगुती उपाय केले जातात. एवढे सगळे करूनही हवी तशी त्वचा मिळवता येत नाही. बाहेरून त्वचेची कितीही निगा राखली तरी, त्वचेला आतून पोषण मिळाले नाही तर यासगळ्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून योग्य आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही बीट आणि चिया सीड्सपासून बनलेल्या हेल्दी सुपरड्रिंकचे सेवन करू शकता.

बीटरूट आणि चिया सीड्समध्ये मोठ्याप्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेसाठी खुपच फायदेशीर ठरतात. बीटरूट मध्ये असलेला नैसर्गिक रंग त्वचेला गुलाबी चमक देतो. यातील पोषक घटक त्वचेला आधिक तरूण व चमकदार बनवतात. बीटरूटमधील अँटिऑक्सिडंट्स फ्री रेडिकल्सशी लढतात आणि त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवतात. यामुळे त्वचा लवकर म्हातारी होत नाही. डाग आणि पुरळ कमी करण्यास मदत होते.

चिया सीड्समुळे त्वचेला हायड्रेशन मिळते ज्याने त्वचा मुलायम राहते. यातील थंड गुणधर्म त्वचेला जळजळ आणि लालसरपणापासून वाचवतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा-३ फॅटी ऍसिड असते जे त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. यामुळे त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या व बारीक रेषा कमी करण्यास मदत होते. शिवाय व्हिटॅमिन ई त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते. तुम्ही तुमच्या आहारात बीटरूट आणि चिया सीड्सचा समावेश एक हेल्दी ड्रिंक म्हणून करू शकता.

बीटरूट आणि चियासीड्सचे ड्रिंक कसे बनवायचे?

१. एक चमचा चिया सीड्स काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.

२. मिक्सरच्या मदतीने एक बीटरूट पाण्यासह बारीक करून ज्यूस तयार करा.

३. या ज्यूसमध्ये भिजलेले चियासीड्स घाला.

४. हवे असल्यास त्यात चवीनुसार मीठ व लिंबाचा रस घाला.

त्वचेसाठीचे हेल्दी ड्रिंक तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Swapna Shastra: स्वप्नात मेलेली व्यक्ती दिसली तर काय संकेत मिळतात?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता शून्य होणार; नवीन सॅलरी स्ट्रक्चर कधी येणार?

Raj Thackeray: काम करायचं नसेल तर पदं सोडा, राज ठाकरेंनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल|VIDEO

Police Viral Video : पोलीस दारू पिऊन २० रुपये हप्ता घ्यायचा, डोंबिवलीतील हवालदाराचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT