Homemade Body Mist: अशाप्रकारे घरीच बनवा बॉडी मिस्ट स्प्रे; घामाच्या दुर्गंधीपासून मिळवा सुटका

Homemade Skincare Products: पावसाच्या दिवसात जितका थंडावा असतो तितकंच गरमही होतं. त्यामुळे शरीराला घाम आणि दुर्गंध येतो. यापासून वाचण्यासाठी तुम्ही घरीच बनवू शकता बॉडी मिस्ट स्प्रे.
homemade body spray
homemade body sprayGoogle
Published On

पावसात वातावरण थंड असले तरी, थोड्यावेळाने ऊन पडतं आणि जास्त गरम होतं. कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी बाहेर पडल्यावर होणारी धावपळ, गर्मी आणि येणाऱ्या घमामुळे शरीराला दुर्गंध येतो. अशावेळी पर्फ्युम किंवा डिओचा वापर केला जातो. यामुळे घामाच्या दुर्गंधीपासून सुटका तर होतेच शिवाय आपल्यात आत्मविश्वासही वाढतो. एखाद्या मिटिंगसाठी किंवा जॉब इंटरव्ह्युवसाठी जाताना पर्फ्युम स्प्रे करून गेल्यास, एक छान सुगंध तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक आकर्षक बनवतो.

आपल्या सर्वांना नेहमी सुगंधीत रहायला आवडतं. बरेचजण वेगवेगळ्या प्रकारचे पर्फ्युम वापरत असतात. पण काहीजणांना पर्फ्युमचा तीव्र सुगंध आवडत नाही म्हणून ते पर्फ्युम वापरणं टाळतात. शिवाय पर्फ्युममध्ये असलेल्या कॅमिकल्समुळे स्किन अॅलर्जी होण्याची शक्यता असते. अशावेळी आपण एका नैसर्गिक आणि परफेक्ट सुगंध असलेल्या पर्फ्युमच्या शोधात असतो. अशावेळी बॉडी मिस्ट हा अगदी योग्य पर्याय ठरतो.

बॉडी मिस्ट म्हणजे काय?

पर्फ्युमच्या तुलनेत बॉडी मिस्ट अत्यंत हलका आणि सौम्य सुगंधाचा असतो. हा एक सुगंधीत स्प्रे आहे. यामध्ये सुगंधी तेलाचे (Fragrance Oil) प्रमाण कमी, तर पाणी आणि अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. शिवाय यामध्ये कॅमिकल्स देखील कमी प्रमाणात असतात. अनेक बॉडीमिस्टमध्ये मॉईश्चरायझिंग घटक असतात जे त्वचेला हायड्रेटेड ठेवतात. तसेच हे अगदी कमी किंमतीत उपलब्ध होतात. तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या सुगंधाचा बॉडी मिस्ट घरच्या घरी देखील तयार करू शकता. तेही काही मोजक्या साहित्याने.

homemade body spray
HIV: असुरक्षित शारीरिक संबंध, वापरलेली सुई अन्.. HIV कशामुळे होतो? सुरूवातीला दिसतील 'ही' लक्षणं

बॉडी मिस्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

१. अर्धा कप गुलाब पाणी

२. तुमच्या आवडीचे सुगंधी तेल (Fragrance Oil)

३. एक कप डिस्टिल्ड वॉटर

४. एक स्प्रे बॉटल

कृती :

स्प्रे बॉटलमध्ये गुलाब पाणी आणि डिस्टिल्ड वॉटर समान प्रमाणात घ्या. सौम्य सुगंधासाठी पाण्याचे प्रमाण कमी करू शकता. नंतर

तुमच्या आवडीच्या सुगंधी तेलाचे १५-२० थेंब त्यात घाला. ते एका चमच्याने छान मिक्स करा आणि स्प्रे बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवा.

homemade body spray
Pimples And Digestion: चेहरा पिम्पल्सने भरलाय? हे असू शकतं कारण, वाचा एक्सपर्ट्स काय सांगतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com