Superfood For Skin
Superfood For Skin Saam Tv
लाईफस्टाईल

Superfood For Skin: वाढत्या वयात त्वचा निस्तेज होते ? अशी घ्या काळजी, आहारात आजच सामील करा हे सूपरफूड

कोमल दामुद्रे

Skin Care Tips : वाढत्या वयात आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. त्वचा निस्तेज किंवा कोरडी होते अशावेळी आपण चेहऱ्याचे सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करतो. परंतु, वय वाढण्यापूर्वी चेहऱ्याची काळजी घेतली तर त्वचा निस्तेज होणार नाही.

बदलेली जीवनशैली (Lifestyle) व खाण्यापिण्याच्या सवयींची वेळीच काळजी घेतली तर वाढत्या वयात सुरकुत्या कमी होऊ शकतात तसेच आहारात (Diet) कोणते सुपरफूड सांगणार आहोत ज्यामुळे त्वचेचा घट्टपणा टिकून राहील जाणून घेऊया त्याबद्दल

1. चीज व दही (Curd)

त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या व निस्तेजपणापासून दूर राहायचे असेल तर आहारात चीज व दह्याचा समावेश नियमितपणे करा. यामध्ये असणारे प्रोटीन त्वचेला घट्ट करण्यास मदत करते. याशिवाय इतर दुग्धजन्य पदार्थांचा देखील समावेश करु शकता

2. ग्रीन टी

तुम्हाला तुमच्या त्वचेचा पोत सुधारायचा असेल तर दुधाचा चहाऐवजी ग्रीन टी प्यायला सुरुवात करा. ग्रीन टी फक्त वजन कमी करण्यासाठीच काम करत नाही तर त्यात पॉलीफेनॉल असतात, जे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असतात. हे प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्या कमी होतात. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते आणि त्वचेचा घट्टपणाही कायम राहतो.

3. क्रूसिफेरस भाज्या

कोबी, टोमॅटो, शिमला मिरची, ब्रोकोली या भाज्यांचा क्रूसिफेरस भाज्यांच्या यादीत समावेश आहे. जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात खाण्यास सुरुवात करावी. त्वचेचा पोत सुधारतो. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक आणि सेलेनियम अधिक प्रमाणात असते. जे कोलेजनचे उत्पादन वाढवतात. याशिवाय ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन नावाचा घटक असतो, जो त्वचेचा कर्करोग रोखण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : उन्हाळ्यात वाहनात मर्यादेपेक्षा जास्त पेट्रोल भरल्यास होऊ शकतो स्फोट? काय आहे सत्य? जाणून घ्या

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

SCROLL FOR NEXT