Heart attack warning signs in women saam tv
लाईफस्टाईल

Heart attack: महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या आठवड्याभरापूर्वी दिसतात 6 मोठे बदल; ही लक्षणं कोणती आहेत वाचा

Heart attack warning signs in women: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे अधिक अस्पष्ट आणि वेगळी असतात. अनेकदा महिलांना छातीत दुखण्याऐवजी अपचन, थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे जाणवतात. त्यामुळे, या लक्षणांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी असतात.

  • छातीत तीव्र वेदना नसल्यासही हार्ट अटॅक असू शकतो.

  • असह्य थकवा हा हार्ट अटॅकचे प्रारंभिक लक्षण असू शकतो.

जेव्हा हार्ट अटॅकचं चित्र डोळ्यासमोर येतं, तेव्हा आपल्याला एखादा पुरुष छातीवर हात ठेऊन खाली कोसळतोय असंच दृश्य आठवतं. अनेक सिनेमा किंवा पुस्तकांतून आपल्यावर झालेला हा प्रभाव मुख्यत्वे पुरुषांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांवर आधारित असतो. मात्र महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं खूपच वेगळी आणि सूक्ष्म स्वरूपाची असू शकतात. जी बहुतेक वेळा थकवा, तणाव, झोपेची कमी अशा गोष्टींसारखी वाटतात. त्यामुळे अनेकदा महिला याकडे दुर्लक्ष करतात.

याच गोष्टी धोकादायक ठरतात कारण लक्षणं चुकीच्या अर्थाने समजून घेतली जातात. CDC (Centers for Disease Control and Prevention) च्या माहितीनुसार, हृदयरोग हा अजूनही महिलांसाठी अजूनही प्रमुख मृत्यूचं कारण आहे. पण तरीही त्याची लक्षणं सामान्य स्वरूपात फारशी दिसत नाहीत. या आर्टिकलमधून आज आपण अशीच लक्षण जाणून घेणार आहोत जी खासकरून महिलांमध्ये अनेक आठवड्यांपूर्वी दिसतात.

छातीत अस्वस्थता

हार्ट अटॅक म्हटलं की छातीत तीव्र वेदना हे प्रमुख लक्षण समजलं जातं. पण महिलांमध्ये ही वेदना तीव्र नसतात. अनेक वेळा ती वेदना वाटतच नाही त्याऐवजी छातीत भरून आलंय, सतत दाब जाणवतोय, घट्ट वाटतंय असा अनुभव येतो. काही महिलांना अपचन किंवा अ‍ॅसिडिटीसारख्या भावना होतात. तर काहींना छातीत किरकोळ दाब जाणवतो.

विचित्र प्रकारचा थकवा

थकवा येणं हे सामान्य आहे. पण जर दिवसभर काहीच न केलं तरी अशक्त वाटणं, काही पावलं चालूनही दम लागणं, किरकोळ कामं करणंही थकव्याचं वाटणं हे लक्षणं हार्ट अटॅकच्या आधी काही दिवस किंवा आठवडे आधी दिसू शकतात. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या अभ्यासानुसार, हा थकवा हा हार्ट अटॅक येण्यापूर्वी महिलांमध्ये दिसणाऱ्या महत्त्वाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे.

अचानक श्वास घ्यायला त्रास होणं

श्वास लागणं हे फक्त फुफ्फुसांचं लक्षण नसतं. महिलांमध्ये अचानक दम लागणं, हलकंसंही काम करताना श्वास नीट न घेता येणं, झोपताना श्वास घ्यायला त्रास होणं हे सगळे हृदयाच्या आजाराचे संकेत असू शकतात. ही लक्षण कधी chest pain शिवायही दिसू शकतात.

मळमळ, अपचन आणि थंड घाम येणं

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या वेळी अपचन, मळमळ, उलटी, पोट फुगणं अशा पचनसंस्थेशी संबंधित लक्षणं अधिक दिसतात. ही लक्षणं अ‍ॅसिडिटीसारखी वाटू शकतात, विशेषतः जेव्हा थंड घाम किंवा चक्कर येणं यासोबत असेल तेव्हा सावध होण्याची गरज आहे. या लक्षणांकडे आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. Journal of the American Heart Association च्या अभ्यासानुसार, अशा लक्षणांमुळेच महिलांमध्ये उपचार उशिरा घेतले जातात.

वेगळ्याच ठिकाणी जाणवणारं दुखणं

हृदयाचं दुखणं फक्त छातीतच जाणवतं असं नाही. महिलांमध्ये ते दुखणं मान, जबडा, खांदे, पाठीचा वरचा भाग किंवा दोन्ही हातांमध्ये जाणवू शकतं. हे दुखणं छातीत टोचल्यासारखं वाटणं, ताणलेलं, दबलेलं किंवा थोडंसं अस्वस्थ वाटणं असतं.

आतून येणारी अस्वस्थता

अनेक महिला हार्ट अटॅक येण्याच्या आधी एक विचित्र, स्पष्ट नसलेली अस्वस्थता जाणवते असं सांगतात. काही वेळा हीच एकमेव पूर्वसूचना असते. हे फारसं panic सारखं नसतं, पण एक प्रकारची जाणीव असते की काहीतरी चुकीचं घडतंय.

महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे का वेगळी असतात?

महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे अधिक सूक्ष्म असतात आणि ती थकवा, अपचन किंवा तणावासारखी वाटतात, ज्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते.

छातीतील अस्वस्थता म्हणजे काय?

छातीत तीव्र वेदना नसतानाही भार, दाब, घट्टपणा किंवा अ‍ॅसिडिटीसारखी भावना छातीतील अस्वस्थता मानली जाते, जी हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते.

थकवा हा हार्ट अटॅकचा संकेत कसा असू शकतो?

अगदी किरकोळ कामानंतरही असह्य थकवा येणे, दम लागणे आणि अशक्तपणा जाणवणे हे हार्ट अटॅकपूर्वीचे महत्त्वाचे लक्षण आहे.

महिलांमध्ये श्वास घेण्यात त्रास होण्याचे कारण काय?

हृदयाच्या कार्यक्षमतेत घट झाल्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे अचानक श्वास घेण्यात त्रास होतो.

मळमळ आणि थंड घाम येणे हे लक्षण का गंभीर आहे?

मळमळ, अपचन आणि थंड घाम येणे ही लक्षणे अ‍ॅसिडिटीसारखी वाटू शकतात, पण ती हार्ट अटॅकची सूचना असू शकतात, विशेषतः जेव्हा ती इतर लक्षणांसोबत असतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर एका महिन्यात किती टोल वसुली? मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे १ नंबर

Badlapur Water Supply : बदलापुरात ऐन पावसाळ्यात पाणी कपात; आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

काँग्रेसच्या महिला खासदाराला लुटले; चैन हिसकावली, कपडे फाडले, सकाळी ६ वाजता दिल्ली हादरली

Raksha Bandhan 2025 : हे तीन गोड आणि पौष्टिक पदार्थ घरच्या घरीच बनवा, रक्षाबंधनाचा दिवस होईल खास

Sakhubai Song: सबसे कातिल गौतमी पाटील थिरकणार सिद्धार्थ जाधवसोबत; आतली बातमी फुटली चित्रपटातील सखूबाई गाणं प्रदर्शित

SCROLL FOR NEXT