Mangalwar Upay saam tv
लाईफस्टाईल

Mangalwar Upay: हनुमानजींचा हा एकच मंत्र करेल चमत्कार; मंगळवारच्या दिवशी उपाय केल्याने आयुष्यात येईल सुख

Mangalwar Upay In marathi: मंगळवार हा दिवस हनुमानजींना समर्पित असल्यामुळे, या दिवशी विशेष उपाय केल्यास बजरंगबली लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते. भगवान हनुमान हे कलियुगातील जागृत देव मानले जातात.

Surabhi Jayashree Jagdish

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा एका देवाला समर्पित केलेला असतो. यामध्ये मंगळवार हनुमानाला समर्पित असतो. या दिवशी संकट मोचन हनुमानाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटं दूर होतात. हनुमानजींच्या विशेष कृपेसाठी काही भाविक या दिवशी उपवासही करतात. पण अनेकदा असं होतं की बरेच प्रयत्न करूनही यश मिळत नाही.

यासाठीच मंगळवारी खऱ्या मनाने बजरंगबलीची पूजा करणं फायद्याचं मानलं जातं. यामध्ये मंगळवारी काही प्रभावी उपाय केले तर सर्व समस्यांवर मात करता येऊ शकतं. या भागात मंगळवारच्या काही प्रभावी उपायांबद्दल जाणून घेऊया.

नोकरी मिळवण्यासाठी खास उपाय

नोकरी करताना तुम्हाला खास यश मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. यामध्ये मंगळवारी भोग म्हणून बजरंगबलीला पान अर्पण करा. यावेळी हनुमानजींसमोर बसून हनुमान चालीसा वाचा.

अपूर्ण कामं पूर्ण करण्याचे उपाय

जर तुमची काही कामं अडकली असतील तर या उपायांमुळे तुम्हाला यश मिळण्यास मदत होणारआहे. यासाठी मंगळवारी एक सोपा पण प्रभावी उपाय करा. मंगळवारी हनुमानजींची खऱ्या मनाने पूजा करावी आणि त्यानंतर त्यांच्यासमोर बसून रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं.

मंगळ दोषासाठी उपाय

मंगळ दोष ज्या व्यक्तींना असेल त्यांनी हा उपाय करावा. जर कुंडलीतून मंगलदोष काढून टाकायचा असेल तर यासाठी गरजूंना लाल मिरची, तांब्याची भांडी आणि तत्सम लाल वस्तूंचं दान करावं.

पैशांची तंगी कशी दूर कराल?

जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर मंगळवारच्या दिवशी काही उपाय फायद्याचे ठरतील. यावेळी मंगळवारी हनुमानजींची पूजा केली आणि या काळात 21 वेळा मंत्राचा जप केला तर धनमार्ग खुला होणार आहे. यावेळी 'ॐ हा हनुमते नम:' या मंत्राचा जप करावा.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - हवामान खात्याचा नंदुरबार जिल्ह्याला येलो अलर्ट

Shikakai Benefits : केस गळती थांबवण्यासाठी आजीबाईंचं जुनं रसायन; वाचा शिकेकाईचे फायदे आणि वापरण्याची योग्य वेळ

Youth Mental Health: डिजिटल डिव्हाईसच्या अतिवापराने तरुणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का?

Rahul Gandhi : माझ्याकडून मोठी चूक झाली; राहुल गांधी यांनी भर सभेत मान्य केलं, नेमकं काय म्हणाले? VIDEO

पांडवकडा धबधब्यावर तरुण अडकला, मदतीसाठी याचना, कसा वाचला जीव, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT