how to preserve spices at long time, Kitchen tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

वर्षभर मसाले टिकवून ठेवण्यासाठी काही सोप्या युक्त्या

भारतीय खाद्यपदार्थाची चव त्यात पडणाऱ्या विविध मसाल्यांमुळेच येते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : स्वयंपाकघरातील पदार्थांची चव वाढवण्याचे व टिकवण्याचे काम मसाले करत असतात. आपल्यापैकी बरेच लोक उन्हाळ्यात घरगुती मसाले बनवतात.

हे देखील पहा -

भारतीय खाद्यपदार्थाची (Food) चव त्यात पडणाऱ्या विविध मसाल्यांमुळेच येते. मसाल्याशिवाय जेवणाची चव कळत नाही. वर्षभर मसाले कसे साठवायचे ? साठवताना काय काळजी घ्याल ? याविषयी जाणून घेऊया.

या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा-

१. स्वयंपाकघरातील मसाले (Spices) वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी ते हवाबंद बॉक्स किंवा डब्यात ठेवणे आवश्यक आहे. आपण मसाले काचेच्या बरणीत किंवा लोखंडी डब्यात ठेवत असू तर, त्यांना हवा लागणार नाही याची काळजी घ्या.

२. मसाल्यांची चव आणि सुगंध अर्थातच आपल्या जेवणाची चव वाढवतो. अशावेळी आपण मसाल्यांचे उन्हापासून रक्षण करायला हवे, यामुळे मसाल्यांचा सुगंध कमी होऊ शकतो. मसाले ठेवण्यासाठी आपण अशी जागा निवडावी ज्यामुळे त्यांचा उन्हाशी संपर्क होऊ शकणार नाही.

३. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात मसाले हे अगदी गॅस जवळ ठेवले जातात. आपल्याला स्वयंपाकघरातील सामान पटापट मिळावा यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करत असतो परंतु, असे केल्याने मसाल्यांची चव टिकून राहात नाही. अति उष्णतेमुळे मसाले लगेच खराब होतात. त्यासाठी आपण मसाले ज्या ठिकाणी ठेवणार आहोत त्याची योग्य ती जागा निवडा त्याचे तापमान राखले जाईल याची काळजी घ्या.

४. जास्त ओलावा स्वयंपाकघरातील मसाल्यांचे बरेच नुकसान करू शकते. अशावेळी आपण मसाले अशा ठिकाणी साठवायला हवे ज्या ठिकाणी ओलावा नसेल. पावसाळ्यात (Monsoon) बऱ्याचदा घरातील काही भागांना ओलावा येतो अशा ठिकाणी मसाले ठेवू नका. मसाला वापरताना त्यात कोरडा चमचा घाला.

५. आपण वर्षभराचा मसाला करतो पण तो किती दिवस टिकेल हे अद्यापह स्पष्ट नाही. मसाला जितका जुना होतो तितकी त्याची चव व सुगंध कमी होऊ लागतो. मसाले फक्त एक वर्षासाठी साठवा. गेल्या वर्षीचे मसाले शिल्लक असतील तर ते आधी वापरावेत नाहीतर, अधिक काळ न वापरल्यास मसाले जेवणाची चव वाढवण्याऐवजी बिघडवू शकतात.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT