मुंबई : पर्यावरणाचे संवर्धन करणे व त्याचे जतन करण्यासाठी दरवर्षी जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो
हे देखील पहा-
पर्यावरण हा निसर्गाचा (Nature) एक महत्त्वपूर्ण भाग आहे. निसर्गाचे संवर्धन व त्याचे जतन करणे हे आपल्या सर्वाचे नागरी कर्तव्य आहे. परंतु, १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि पर्यावरणात बदल होत गेला. मानवी कृतींमुळे जागतिक तापमान वाढ, हवा, पाणी आणि जमीनीचे प्रदूषण (Pollution) आणि जैवविविधतेचे नुकसान यासारखे व्यापक पर्यावरणाचे नुकसान झाले आहे. आपल्या नैसर्गिक जगाला असलेले हे धोके अधोरेखित करण्यासाठी आणि लोकांना त्याचे संरक्षण करण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
इतिहास :
स्वीडनमधील स्टॉकहोम येथे ५० वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेत जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना मांडण्यात आली. जी पहिल्यांदा १९७३ मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यादिवसापासून ५ जून रोजी जागतिक (World) पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
थीम :
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील जागतिक पर्यावरण दिनाच्या उत्सवाची थीम आहे. 'फक्त एक पृथ्वी' यंदा ही थीम आहे. स्टॉकहोम येथे १९७२ च्या परिषदेचे हे घोषवाक्य देखील होते ज्यामुळे ५ जून रोजी हा दिवस जागतिक कार्यक्रम म्हणून साजरा करण्यात यावा असे ठरविले गेले
महत्त्व :
मानवाच्या उत्क्रांतीमुळे ग्रीन हाउसमधून वायू उत्सर्जन होऊन जागतिक तापमान असुरक्षित पातळीवर वाढत आहे. त्यामुळे हवामानात असंख्य बदल घडून वनस्पती व प्राणी नष्ट होत आहे. कारखान्यांमधून होणारे प्रदूषण, प्लास्टिक कचरा, जंगलतोड यामुळे जमीन आणि समुद्रावरील प्राणी मारले जात आहेत.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सुधारात्मक उपाययोजना करण्याची तातडीची गरज आहे. अशा सुधारात्मक उपायांचा अवलंब करण्यास उद्युक्त करण्यासाठी युनायटेड नेशन ५ जून रोजी नागरी समाज, सरकार, शाळा, व्यवसाय आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या सहभागासह अनेक जागरूकता कार्यक्रम आयोजित करते.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.