जागतिक सायकल दिवस : महत्त्व आणि त्याचे फायदे

जागतिक सायकल दिन जगभरात का साजरा केला जातो?
Cycling benefits in Marathi, cycling benefits for weight loss
Cycling benefits in Marathi, cycling benefits for weight lossब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सायकल आणि त्याचे आपल्या आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांसाठी ३ जून रोजी दरवर्षी जगभरात जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. (Benefits of cycling in Marathi)

हे देखील पहा -

सायकल व त्याच्या चालवण्याच्या फायद्यांविषयी जनजागृती वाढवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. सायकलमुळे आपले आरोग्य सुधारते तसेच त्याच्यामुळे पर्यावरणाचे ही मोठ्या प्रमाणात रक्षण होते. सायकल चालवल्याने शारिरीक व मानसिक आरोग्य देखील सुधारते. दररोज किमान अर्धा तास सायकल चालवल्याने लठ्ठपणा, हृदयविकार, मानसिक आजार, मधुमेह अशा अनेक आजारांपासून आपले रक्षण होते.

इतिहास -

सायकल दिन साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील माँटगोमेरी कॉलेजचे प्रोफेसर लेझेक सिबिल्स्की यांनी याचिकेच्या स्वरूपात दिला होता. १९९० च्या काळात सायकल चालवण्यासाठी अनेकांनी प्रोत्साहन दिले परंतु, हळूहळू या दिनाचे महत्त्व कमी होत गेले. त्यानंतर युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने या दिनाचे महत्त्व जपण्यासाठी ३ जून २०१८ रोजी हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला गेला त्यादिवसापासून हा दिवस दरवर्षी जगभरात साजरा केला जातो.

Cycling benefits in Marathi, cycling benefits for weight loss
केसांचा तेलकटपणा घालवण्यसाठी हा हेअर केअर रूटीन फॉलो करा

महत्त्व -

युनायटेड नेशन्सच्या मते, हा दिवस साजरा करण्यामागे पादचारी सुरक्षा व सायकलिंग सुरक्षिततेलाही प्रोत्साहन देता यावे यासाठी केला गेला आहे. समाजातील सर्व घटकांमध्ये सायकलचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य (Health) सुदृढ करण्यासाठी राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर सायकल चालविण्यास प्रोत्साहन देणे.

सायकल चालवण्याचे फायदे (Cycling benefits in Marathi)

- सायकल चालवल्याने वातावरणात प्रदूषण होत नाही.

- किमान अर्धा तास सायकल चालवल्याने शरीर तंदुरुस्त राहते तसेच, वजन कमी (Weight loss) करता येते.

- सायकल चालवल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहून पचनक्रिया सुधारते.

- दररोज सायकलिंग केल्याने मेंदू १५ ते २० टक्के सक्रिय राहतो.

- तसेच, हृदय आणि फुफ्फुस मजबूत राहतात आणि अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com