Is Breathlessness A Sign Of Heart Disease saam tv
लाईफस्टाईल

Heart Disease: आता घर बसल्या तुम्हाला समजेल की हृदयाच्या धमन्या ब्लॉक झाल्यात; पाहा या ४ सोप्या गोष्टी

Is Breathlessness A Sign Of Heart Disease: हृदयात ब्लॉकेज आहे का याची भीती वाटते? काही सोप्या घरगुती तपासण्यांमधून सुरुवातीची लक्षणं ओळखता येऊ शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

जर तुमचं हृदय निरोगी असेल तर तुम्ही फीट आहात असं मानलं जातं. अनेकांना आपल्याला ब्लॉकेज असतील का हा प्रश्न सतावत असतो. ब्लॉकेजेस असतील या भीतीने आपण टेस्टही करून घेत नाही. पण तुम्हाला माहितीये का की, तुम्ही काही सोप्या घरगुती तपासण्या करून सुरुवातीची लक्षणं ओळखू शकता.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होणं थेट हे तुम्हाला टेस्टमधून समजतं. मात्र तुम्ही घरी असल्यावर शरीर काही सिग्नल देतं जे धोक्याचे संकेत देऊ शकतात.

नियमित रक्तदाब तपासणी

रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्यास पहिला आणि सोपा मार्ग म्हणजे नियमितपणे तुमचा रक्तदाब तपासणं. हाताच्या वरच्या बाजूला असलेला एटोमॅटिक डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर अचूक रिडींग देतो. तुमचा रक्तदाब मोजण्यापूर्वी किमान पाच मिनिटं शांतपणे बसा. यावेळी तुमचे पाय जमिनीवर सपाट ठेवा आणि तुमच्या पाठीला आधार द्या.

हे सकाळी आणि रात्री दोन वेळा मोजा. असं एका आठवड्यासाठी करा आणि नंतर सर्व रिडींगची सरासरी काढा. जर तुमचा रक्तदाब वारंवार जास्त असेल तर ते तुमच्या धमन्यांवर वाढलेल्या दाबाचं लक्षण असू शकतं. साधारणपणे, १२०/८० मिमीएचजीच्या आसपास रक्तदाब सामान्य मानला जातो.

एंकल ब्रॅकियल इंडेक्स

आणखी एक महत्त्वाची चाचणी म्हणजे एंकलचा ब्रेकियल इंडेक्स. मेयोक्लिनिकनुसार, ही चाचणी पाय आणि हातांमधील रक्तदाबाची तुलना करते. यामुळे धमन्यासंबंधीच्या समस्यांचा धोका ओळखता येतो. जर घोट्यापासून हातापर्यंत दाबाचं प्रमाण ०.९० पेक्षा कमी असेल तर ते हृदयाच्या समस्यांचा धोका वाढण्याचे संकेत देऊ शकते. ही पद्धत अचूक मानली जाते आणि लवकर तपासणी करण्यास मदत करते.

लिपिड प्रोफाइल टेस्ट

तिसरी महत्त्वाची पायरी म्हणजे लिपिड प्रोफाइल टेस्ट. आता अनेक प्रयोगशाळांमध्ये घरच्या घरी नमुने गोळा करण्याची सुविधा देण्यात येते. ही चाचणी एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल, एचडीएल आणि ट्रायग्लिसराइड्स मोजते. विशेषतः हाय एलडीएल कोलेस्ट्रॉलमुळे धमन्यांमध्ये प्लाक जमा होण्याचा धोका वाढतो. टेस्टपूर्वी सामान्यतः १२ तासांचा उपवास आवश्यक असतो. जोपर्यंत तुमचा डॉक्टर अन्यथा सल्ला देत नाहीत. रिपोर्ट ऑनलाइन उपलब्ध आहे, ज्यामुळे त्याचा मागोवा घेणं सोपं होतं.

पायऱ्या चढण्यास त्रास होणं

संथ गतीने चार पायऱ्या चढा. अशावेळी जर तुम्हाला छातीत दाब, श्वास घेण्यास त्रास, जबड्यात किंवा हातात वेदना किंवा चक्कर येत असेल तर ताबडतोब थांबा. या लक्षणांचा कालावधी आणि त्यांना काय कारणीभूत ठरतं हे देखील लक्षात घ्या. श्रम करताना दिसणारी ही लक्षणं कोरोनरी धमनी समस्येचा धोका दर्शवू शकतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT