SIM Card Rule Saam Tv
लाईफस्टाईल

1 डिसेंबरपासून Sim Card खरेदीसाठी नवे नियम! मोडणाऱ्यांना लाखोंचा दंड

SIM Card Rule Change : तुम्ही देखील मोबाईल फोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकार 1 डिसेंबरपासून सिमकार्ड खरेदीसाठी नवीन नियम लागू होणार आहे. जर तुम्ही नवीन सिम खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी नवीन नियमांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

Shraddha Thik

SIM Card Rule :

तुम्ही देखील मोबाईल फोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकार 1 डिसेंबरपासून सिमकार्ड खरेदीसाठी नवीन नियम लागू होणार आहे. सरकार सुरुवातीला 1 ऑक्टोबरपासून सिमकार्डसंबंधित नियम (Rules) लागू करणार होते, मात्र नंतर दोन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. जर तुम्ही नवीन सिम खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी नवीन नियमांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बनावट सिमद्वारे अनेक प्रकारचे स्कॅम (Scam) आणि फ्रॉड केली जाते. ही बाब लक्षात घेऊन वाढत्या फ्रॉडच्या घटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने सिमकार्ड खरेदीसाठी नवीन नियम आणले आहेत. आता हे नियम 1 डिसेंबरपासून संपूर्ण भारतात लागू होणार आहेत.

बनावट सिमकार्डमुळे (Sim Card) होणारे स्कॅम आणि फ्रॉडबाबत केंद्र सरकार अत्यंत कडक नियम काढले आहेत, त्यामुळेच नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये शिक्षेची तरतूदही आहे. सिम विकणाऱ्याने किंवा खरेदी करणाऱ्याने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याला दंड भरावा लागेल किंवा तुरुंगात जावे लागेल. 1 डिसेंबर 2023 पासून काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊयात.

सिम डीलर्सची व्हेरिफिकेशन केले जाईल

सिम कार्डच्या नवीन नियमांनुसार, सिम विकणाऱ्या सर्व डीलर्सना व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक असेल. एवढेच नाही तर डीलर्सना सिम विक्रीसाठी नोंदणी करणेही बंधनकारक असेल. कोणत्याही सिम विकणाऱ्या व्यापाऱ्याची पोलिस पडताळणीसाठी टेलिकॉम ऑपरेटर जबाबदार असतील. नियमांकडे दुर्लक्ष केल्यास 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. कृपया लक्षात घ्या की व्यापाऱ्यांच्या व्हेरिफिकेशनसाठी 12 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

डेमोग्राफिक डेटा कलेक्ट केला जाईल

जर एखाद्या ग्राहकाला त्याच्या जुन्या नंबरवर सिम कार्ड घ्यायचे असेल तर त्याचे आधार स्कॅन करणे आणि त्याचा डेमोग्राफिक डेटा गोळा करणे गरजेचे असेल.

सिमकार्ड बंद करण्याचा हा नियम असेल

नवीन सिम कार्ड नियम लागू केल्यानंतर, सिम कार्ड मोठ्या प्रमाणात जाहिर केले जाणार नाहीत. मोठ्या प्रमाणात सिमकार्ड खरेदी करण्यासाठी आता लोकांना बिझनेस कनेक्शन घ्यावे लागणार आहे. पण जर एखाद्या युजरला पूर्वीप्रमाणे एका आयडीवर 9 सिम कार्ड मिळवायचे असतील तर तो तसे करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला त्याचे सिमकार्ड बंद करायचे असेल तर तो क्रमांक दुसऱ्या व्यक्तीला 90 दिवसांनंतरच लागू होईल.

तुरुंगवास आणि दंडाची तरतूद

सिमकार्डच्या नवीन नियमांनुसार, सर्व सिम विकणाऱ्या विक्रेत्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड आणि तुरुंगवासही होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

SCROLL FOR NEXT