Sikkim Tourism Saam tv
लाईफस्टाईल

Sikkim Tourism : सिक्कीममध्ये पर्यटकांचा पूर; तुम्ही जाणार असाल, तर ४ ठिकाणी जायला विसरू नका

Sikkim Tourism update : यंदाच्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पर्यटकांची विक्रमी गर्दी झाली होती. त्यामुळे सिक्कीम राज्याला मोठा आर्थिक फायदा झाला.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : देशातील पर्यटकांची सिक्कीमला चांगली पसंती मिळत आहे. दरवर्षी सिक्कीम राज्यात लाखोच्या संख्येने भेट देत असतात. यंदाच्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पर्यटकांची विक्रमी गर्दी झाली होती. त्यामुळे सिक्कीम राज्याला मोठा आर्थिक फायदा झाला. पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यात पर्यटकांची विक्रमी गर्दी झाल्याचे दिसून आले. या कालावधीत २९०,४०१ पर्यटकांनी भेट दिली. त्यातील २५६५३७ पर्यटक देशातील होते. तर ३०,८६४ विदेशी पर्यटक होते. ऑक्टोबर २०२३ मध्ये मोठा पूर आल्यानंतर पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता या क्षेत्राने उसळी घेतली आहे.

या वर्षाच्या तिमाहितील पर्यटकांच्या आकडेवारीच्या अंदाजानुसार या वर्षी या राज्यात १२ पर्यटक भेट देऊ शकतात. या राज्यात लेपचा , भुटिया, नेपाळी समाजाचे लोक मिळून मिसळून राहतात. सण आणि खाण्यापिण्यातही विविधता आढळते.

सिक्किमच्या गंगटोकशिवाय कुठे फिराल?

लाचुंग - लाचुंग सिक्कीममधील एक सुंदर गाव आहे. या भागातून हिमालय खूप भारी दिसतो. घाट,झरे, जंगलाने घेरलेलं शहर स्वर्गासारखं दिसतं असं बोलायलाही हरकत नाही.

लाचेन - लाचुंग हे सिक्कीममधील दुसरं सुंदर गाव आहे. येथील घरे आणि संस्कृती पर्यटकांना आकर्षित करते.

युमथांग घाटी - युमथांग घाट हे उत्तर सिक्कीममध्ये आहे. या भागातून गंगाटोक हे १४८ किमी दूर आहे. हा सिक्कीममधील सुंदर घाट मानला जातो. हिमालयावरील मिळणाऱ्या फुलांच्या जाती या भागातही पाहायला मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT