Wrong Sitting Posture  Saam Tv
लाईफस्टाईल

Wrong Sitting Posture: ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी बसून काम करताय? जडू शकतो पाठदुखीचा असह्य त्रास, कशी घ्याल काळजी?

Back Pain : जर तुम्ही देखील कामाच्या ठिकाणी ८ तास एकाच पद्धतीने बसत असाल तर अशावेळी आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Effects of Wrong sitting Posture in the Office :

बदलेली जीवनशैली, कामाच्या पद्धती आणि सतत एकाच जागी बसून काम करण्याच्या सवयीमुळे भारतातील ९० टक्के लोकांना आजार जडले आहेत.

ऑफिसमध्ये आपण साधारणत: ८ ते ९ तास असतो. चुकीच्या पद्धतीने बसल्यास आरोग्यावर परिणाम होतो. लॅपटॉप आणि कम्प्युटरच्या खुर्चीवर बसून काम करत राहातात ज्याच्या आपल्या पाठीच्या कण्यावर परिणाम होतो. अनेकदा आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्येंना सामारे जावे लागते.

जर तुम्ही देखील कामाच्या ठिकाणी ८ तास एकाच पद्धतीने बसत असाल तर अशावेळी आरोग्याची (Health) काळजी कशी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

1. फेरफटका मारा:

काम करताना काही वेळ उठून चाला. दर तासाला किमान ५ मिनिटे चाला. असे केल्याने शरीरातील रक्तदाब आणि साखरेची (Sugar) पातळी नियंत्रणात राहू शकते.

2. नीट बसा:

सतत मान वाकवून बसणे, ताठ न बसणे किंवा पाय दुमडून बसल्यामुळे अनेक पटीने समस्या वाढू लागतात. यासाठी चुकीच्या पद्धतीने बसू नका. तुमची पाठ (Back Pain) सरळ आणि दोन्ही पाय जमिनीवर ठेवून बसा.

3. बॉडी स्ट्रेच करा:

तुमची मान, बोटे, हात आणि पाठ वेळोवेळी ताणत राहा, जेणेकरून स्नायू लवचिक राहतील. ज्यामुळे हातापायांना मुंग्या येणार नाही. तसेच जळजळ देखील कमी होईल.

4. डोळे बंद करून आराम करा:

सततच्या स्क्रीन वापराचा डोळ्यांवर परिणाम होतो. अशावेळी दर तासाला काही सेकंद डोळे बंद करा. यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी होतो. मानसिक शांतीही मिळते. तसेच कामात पुन्हा मन एकाग्र होण्यास मदत मिळते. याशिवाय थकलेल्या डोळ्यांनाही विश्रांती मिळते.

5. व्यायाम करा:

नियमितपणे काही तास व्यायाम करा ज्यामुळे दिवसभर ऊर्जात्मक राहाल. तसेच व्यायाम केल्यामुळे पाठदुखीच्या समस्यांपासून सुटका होईल.

वेळीच लक्ष द्या अन्यथा...

सतत एकाच जागी बसून राहिल्यामुळे शारीरिक, मानसिक ताण जाणवतो. तसेच शरीरात थकवा निर्माण होतो. ज्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या आजारांपासून दूर राहता येईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

SCROLL FOR NEXT