Tongue Taste Change: तोंडाची चव बिघडलीये? असू शकतात गंभीर आजार, दुर्लक्ष करु नका

Tongue Taste Change Symptoms : जिभेला चव नसण्याची अनेक कारणे असू शकतात.
Tongue Taste Change
Tongue Taste ChangeSaam tv
Published On

Why Taste Buds Change :

जेवण करताना अनेकदा आपल्याला पदार्थांची चव लागत नाही. तोंडाला आणि जिभेला चव नसण्याची अनेक कारणे असू शकतात.

यामध्ये तोंडाची दुर्गंधी, दातांची योग्य स्वच्छता न करणे, तोंडातील संसर्ग किंवा भरपूर ताप आल्यानंतर तोंडाची चव बिघडते. याचे मुख्य कारण तापाने आजारी पडल्यामुळे तोंडाची आणि जिभेची चव निघून जाते.

आजारातून (Disease) बरे झाल्यानंतर अनेकदा तोंडाची चव जाते. कोणाताही पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला पदार्थांची चव कळत नाही. तसेच सतत पाण्याची तहान देखील लागते. परंतु, अशावेळी अनेक गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. यात जीभेची चव आणि रंग बदलतो त्यामुळे वेळीच काळजी (care) घ्यायला हवी. तसेच शरीर आपल्याला काही आजारांचे संकेत देते जाणून घेऊया त्याबद्दल

1. फ्लू

बरेच दिवस ताप येऊन गेल्यानंतर आपल्या जिभेची चव बिघडते. ही शारीरिक समस्या आहे. परंतु, बरेचदा हे गंभीर आजाराचे लक्षण (Symptoms) देखील मानले जाते.

Tongue Taste Change
Sun Tanning Skin : ऑक्टोबर हिटमुळे त्वचेवर होतोय परिणाम? कशी घ्याल काळजी

2. मधुमेह

मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या जिभेच्या चवीत अनेक बदल होताना दिसतात. तसेच त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त देखील यामुळे होते.

3. दातांचे आरोग्य

दातांच्या समस्यांवर जिभेच्या चवीवर परिणाम होतो. हिरड्यांना आलेली सूज, तोंडाची दुर्गंधी किंवा दातांमध्ये पोकळी निर्माण झाल्यामुळे जिभेची चव बिघडते. यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

Tongue Taste Change
Egg Benefits For Hair : केसातील कोंड्यापासून त्रस्त आहात? सतत केस कडक होतात, हा हेअर मास्क ठरेल फायदेशीर

4. न्यूरोलॉजिकल समस्या

पार्किन्सनचा आजार, अल्झायमरसारख्या गंभीर आजारत देखील जिभेची चव बदलते. त्यासाठी वेळीच काळजी घ्यायला हवी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com