Shukra-Guru Gochar 2024  Saam Tv
लाईफस्टाईल

Shukra-Guru Gochar 2024 : १२ वर्षानंतर शुक्र-गुरुचे संक्रमण! या राशींना लागेल लॉटरी, व्यापारात होईल वाढ

Shukra-Guru Gochar Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे संक्रमण हे विशिष्ट वेळेनुसार होत असते. प्रत्येक ग्रहाचे विशेष असे महत्त्व आहे. देव गुरु लवकरच राशी बदलणार आहे. त्यामुळे गुरु ग्रह आपली राशी बदलेल.

कोमल दामुद्रे

Shukra-Guru Gochar In Vrushabha Rashi 2024 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे संक्रमण हे विशिष्ट वेळेनुसार होत असते. प्रत्येक ग्रहाचे विशेष असे महत्त्व आहे. देव गुरु लवकरच राशी बदलणार आहे. त्यामुळे गुरु ग्रह आपली राशी बदलेल.

१ मे रोजी गुरु मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. त्याच वेळी प्रेम आणि समृद्धीचा कारक शुक्र देखील वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचा प्रवेश होताच गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. जो खूप लाभदायक मानला जाणार आहे. असे मानले जात आहे की, १२ वर्षांनी वृषभ राशीमध्ये गुरु-शुक्र संयोग तयार होईल. गुरु-शुक्र यांच्या संयोगाने निर्माण झालेल्या गजलक्ष्मी योगामुळे कोणत्या राशी धनवान होतील हे जाणून घेऊया.

1. मेष

या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोगामुळे मेष राशीला खूप फायदा होईल. लक्ष्मी देवीच्या कृपेने व्यवसायात (Business) फायदा होईल. पैसे (Money) येण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवाल. मन प्रसन्न राहिल. आरोग्य चांगले राहिल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.

2. कर्क

गुरु आणि शुक्र यांच्या संयोगाने तयार झालेला गजलक्ष्मी राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. करिअरमध्ये (Career) नवीन संधी गाठू शकाल. रखडलेले पैसे मिळतील. आरोग्य उत्तम राहिल. इच्छुकांचे लग्न लवकरच जमेल.

3. सिंह

गजलक्ष्मी राजयोगामुळे सिंह राशीचे लोक मालामाल होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहिल. व्यावसायासाठी हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja : ३३ तासांनी लालबागच्या राजाचं अखेर विसर्जन, पाहा शेवटची झलक; VIDEO

Iron Deficiency : जास्त चहा प्यायल्याने शरीरात आयरनची कमतरता होते का?

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला २४ तास उशीर, जबाबदार कोण? अध्यक्षांकडून दिलगिरी

Lalbaugcha Raja Visarjan : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

Lalbaghcha Raja : फटाक्यांच्या आतिषबाजीत लालबागच्या राजाला दिला निरोप, VIDEO

SCROLL FOR NEXT