Shukra Gochar Saam Tv
लाईफस्टाईल

Shukra Gochar : जुलै महिन्यात या राशींचे भाग्य पलटणार ! मिळतील नोकरीच्या नव्या संधी तर, काहींनी सावध राहा

Shukra In Kundali : असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र शुभ असतो.

कोमल दामुद्रे

Shukra Che Rashi Parivartan : ज्योतिषशास्रानुसार शुक्र हा ग्रह भौतिक सुख-सुविधांचा कारक मानला जातो. असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र शुभ असतो. त्या व्यक्तीला सर्व सुख सुविधा प्राप्त होतात. त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवन आनंदाने व शांततेने जाते.

७ जुलैला शुक्र हा सिंह राशीत संक्रमण करणार आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे काहींना लाभ होणार आहे तर काहींनी सांभाळून राहा. कोणत्या राशींना फायदा होणार आहे हे जाणून घेऊया

1. वृषभ

या राशीसाठी शुक्राचे (Shukra) संक्रमण शुभ ठरणार आहे. या राशीच्या कुंडलीच्या चौथ्या भावात शुक्राचे संक्रमण होणार आहे. अनेकांना भौतिक सुखांचा लाभ मिळेल. व्यवसायात पैसा (Money) मिळण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर कामाच्या ठिकाणी प्रमोशनही मिळू शकते. यावेळी कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता. मालमत्ता, खाद्यपदार्थ इत्यादी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे.

2. सिंह

शुक्राचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या राशीच्या चढत्या घरात शुक्राचे भ्रमण होणार आहे. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व (Personality) सुधारेल. त्याच वेळी, व्यक्तीच्या सर्व कामांमध्ये चांगले परिणाम दिसून येतील. तुम्ही कोणत्याही कामात हात लावाल, त्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला सन्मान मिळेल. जीवनसाथीकडून प्रगती होऊ शकते. जे अविवाहित आहेत, त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

3. तूळ

शुक्राचा सिंह राशीत प्रवेश तूळ राशीच्या लोकांचे भाग्य उजळवणार आहे. या राशीच्या उत्पन्नाच्या घरात शुक्राचे भ्रमण होणार आहे. या दरम्यान करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. यावेळी तुम्ही मोठी कमाई करू शकता. यातून तुम्हाला विशेष फायदा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग खुले होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. शेअर मार्केट इत्यादीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल राहील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT