Shani-Mangal Yuti : शनि-मंगळच्या युतीमुळे येणार वादळ! या राशींना करावा लागणार आर्थिक तंगीचा सामना, करिअरला लागेल ब्रेक

Shani Mangal In Kundali : सिंह राशीत असणारा मंगळ हा शुभ प्रभाव देईल परंतु, शनि सोबत असल्यामुळे त्याचे अशुभ परिणामही भोगावे लागतील
Shani-Mangal Yuti
Shani-Mangal Yuti Saam Tv
Published On

Shani Mangal Yuti Makes Samsaptak Yog : ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहाच्या गोचर व युतीमुळे अनेकांच्या जीवनावर त्यांचा शुभ व अशुभ असा प्रभाव पडतो. शनि हा ग्रह दुषित असल्यास अनेकांना संकटांचा सामना करावा लागतो. तर मंगळ हा ग्रह कडक असल्यास वैवाहिक जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते.

मंगळ ग्रह हा १ जुलै नंतर सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत असणारा मंगळ हा शुभ प्रभाव देईल परंतु, शनि सोबत असल्यामुळे त्याचे अशुभ परिणामही भोगावे लागतील. शनि नुकताच वक्री होऊन कुंभ राशीत प्रवेश केला आहे. मंगळ-शनि युतीमुळे कोणत्या राशीला अडचणीचा सामना करावा लागेल हे पाहूया

Shani-Mangal Yuti
Mangal Budh And Shukra Gochar: मंगळ-बुध-शुक्र ग्रहाचे संक्रमण; या राशींना होईल आर्थिक लाभ, करिअर-नोकरीत बढतीची शक्यता

1. मेष

मंगळ (Mangal) हा मेष राशीच्या पाचव्या घरात विराजमान होणार आहे. तर शनि हा अकराव्या स्थानात आहे. त्यामुळे होणारे परिणाम हे स्पष्टपणे दिसून येतील. जर शेअर बाजारात गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करत असाल तर ती टाळा. कोणतीही गोष्ट हाताळतांना ती नम्रपणे हाताळा. शिक्षण व प्रेमात अडचणी येतील.

Shani-Mangal Yuti
Ashadhi Ekadashi Wishes : सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी...,आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तांना याप्रकारे पाठवा शुभेच्छा !

2. कन्या

कन्या राशीच्या बाराव्या मंगळ विराजमान होणार आहे तर शनि सहाव्या भावात बसला आहे. मंगळाच्या खराब स्थितीमुळे या राशीच्या लोकांना आरोग्यासंबंधी (Health) समस्या येऊ शकतात. त्याचबरोबर आयात-निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठीही हा काळ अडचणीचा ठरू शकतो. खर्च वाढतील. कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

3. मकर

मकर राशीच्या लोकांसाठी शनि आणि मंगळाच्या संयोगाने तयार झालेला संसप्तक योग अत्यंत अशुभ असणार आहे. या काळात कुटुंबात तेढ निर्माण होऊ शकते. तणाव वाढू शकतो. एवढेच नाही तर आध्यात्मिक कार्यात व्यक्तीची आवड वाढेल. उपासनेतून विशेष लाभ होईल. बोलण्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com