Prasadacha sheera Saam Tv
लाईफस्टाईल

Shravan Special Recipe 2023 : शेवटच्या श्रावणी सोमवारी बनवा 'प्रसादाचा शिरा', कापसासारखा मऊ होईल; पाहा रेसिपी

Shravani Somvar Recipe : श्रावणी सोमवारी प्रसादासाठी आपण अनेक नव्या रेसिपी ट्राय करतो.

कोमल दामुद्रे

Satyanarayan Prasad Sheera Recipe:

श्रावण महिना म्हटलं की, अनेक गोडाधोडाचे पदार्थ हमखास बनवले जातात. श्रावणी सोमवारी प्रसादासाठी आपण अनेक नव्या रेसिपी ट्राय करतो. त्यातील काही रेसिपी फसतात तर काही एकदम परफेक्ट बनतात.

तुम्ही देखील येत्या श्रावणी सोमवारी सत्यनारायणासारखा प्रसादाचा शिरा बनवायचे ट्राय करत असाल तर ही रेसिपी नक्की पाहा. युट्यूब पेज सरिता किचनकडून जाणून घेऊया एकदम परफेक्ट कापसासारखा मऊ शिरा कसा बनवायचा ते.

साहित्य-

1. सव्वा वाटीच्या प्रमाणात

केळी (Banana) - सव्वा केळ / Banana - 1 & 1/4

• रवा - सव्वा वाटी / Semolina - 1 & 1/4 Bowl

• तूप - सव्वा वाटी / Ghee - 1 & 1/4 Bowl

साखर (Sugar) - सव्वा वाटी / Sugar - 1& 1/4 Bowl

दूध (Milk) - सव्वा वाटी / Milk - 1& 1/4 Bowl

• पाणी - सव्वा वाटी / Water - 1& 1/4 Bowl

• काजू - ५ ते ७ / Cashew 5 to 7

• बदाम - ५ ते ७ / Almonds 5 to 7

• तुळस - ५ ते ७ / Tulasi Leaves 5 to 7

2. सव्वा किलोच्या प्रमाणात

• केळी - ११ केळ / Bananas - 11 banana

• रवा - सव्वा किलो / Semolina - 1& 1/4 Kilo

• तूप - सव्वा किलो / Ghee - 1& 1/4 Kilo

• साखर - सव्वा किलो / Sugar - 1& 1/4 Kilo

• दूध - सव्वा लिटर / 1& 1/4 liters

• पाणी - सव्वा लिटर / 1& 1/4 liters

• काजू - २१ / Cashew 21

• बदाम - २१ / Almond 21

• तुळशीची पाने - २१ / Tulsi leaves 21

3. कृती

  • सर्वप्रथम एका पातेल्यात दीड कप पाणी आणि दूध घालून गरम करायला ठेवा.

  • त्यानंतर केळी, काजू आणि बदामाचे काप करुन घ्या.

  • गॅसवर कढई ठेवून त्यात तूप घालून ड्रायफ्रूट्स तळून बाजूला ठेवा. नंतर त्याच तूपात आणखी थोडे तूप घालून वरुन रवा घाला.

  • रवा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्या. नंतर त्यात केळीचे काप घालून चांगले ढवळून घ्या. मिश्रण चांगले शिजू द्या.

  • नंतर त्यात तापवलेलं दूध हळू हळू रव्याच्या मिश्रणात घालून हळूहळू ढवळत राहा. त्यानंतर मिश्रण घट्ट झाल्यास चांगले परतवून घ्या.

  • कढईवर ताट झाकून वाफ काढून घ्या. थोड्यावेळाने पुन्हा त्याला तूप सुटेल. चांगले परतवून घ्या आणि वरुन साखर घाला.

  • साखर चांगली परतवून घेतल्यानंतर पुन्हा त्याला तूप सुटेल. पुन्हा ताट झाकून वाफ काढा. वरुन ड्रायफ्रूट्स घालून तुळशीचे पान घाला.

  • केळीच्या पानात सर्व्ह करा मस्त लुसलुशीत कापसासारखा मऊ शिरा, तोंडात टाकताच विरघळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT