Kitchen Colour Vastu Tips saam tv
लाईफस्टाईल

Kitchen Colour Vastu Tips: किचनमधील भिंतींना काळा रंग द्यावा का? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं, कोणते रंग शुभ?

Kitchen Colour As Per Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये काळ्या रंगाचा वापर का टाळावा? स्वयंपाकघरासाठी कोणते रंग शुभ मानले जातात आणि कोणते रंग वापरणे टाळावे, जाणून घ्या. सकारात्मक वातावरणासाठी किचनच्या भिंती, कपाटे आणि इतर वस्तूंसाठी योग्य रंगांची निवड करा.

Surabhi Jayashree Jagdish

घरातील स्वयंपाकघर म्हणजेच किचन हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे किचन नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये सकारात्मक ऊर्जा असणं महत्त्वाचं मानलं जातं. याचा चांगला परिणाम संपूर्ण घरावर होतो, अशी मान्यता आहे. पण किचनशी संबंधित काही चुका घरात नकारात्मक ऊर्जा, वाद आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.

यामध्ये किचनमधील रंगांनाही विशेष महत्त्व दिलं जातं. अनेक जण स्वयंपाकघरात काळ्या रंगाची भांडी, कपडे, भिंती किंवा इतर वस्तू वापरतात. पण वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये काळ्या रंगाचा जास्त वापर करणं शुभ मानलं जात नाही. असं का सांगितलं जातं आणि किचनसाठी कोणते रंग योग्य आहेत, ते जाणून घेऊया.

किचनमध्ये काळ्या रंगाचा वापर का करू नये?

वास्तुशास्त्रानुसार, किचन हे अग्नी तत्त्वाशी संबंधित ठिकाण मानले जाते. तर काळा रंग सकारात्मक ऊर्जा आणि प्रकाश शोषून घेतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे हा रंग अग्नी तत्त्वासाठी योग्य मानला जात नाही. यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकतं. कुटुंबातील सदस्यांना बेचैनी आणि मानसिक तणाव जाणवू शकतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे किचनमध्ये काळ्या रंगाचा जास्त वापर टाळण्याचा सल्ला दिला जातो.

किचनच्या भिंतींना काळा रंग देणं टाळावं. त्याचप्रमाणे काळ्या रंगाची इलेक्ट्रॉनिक उपकरणं, नळ, सिंक, सामान ठेवण्याची कपाटं, भांडी, डिनर सेट आणि इतर सजावटीच्या वस्तूंचा वापरही शक्य तितका कमी करावा.

किचनमध्ये कोणते रंग वापरणं टाळावं?

वास्तुशास्त्रानुसार, काळ्या रंगासोबतच गडद निळा, जांभळा, राखाडी, लाल, सोनेरी आणि गडद तपकिरी रंगांचाही किचनमध्ये वापर करू नये, असं सांगितलं जातं. हे रंग अग्नी तत्त्वाच्या विरुद्ध मानला जातो. त्यामुळे किचनमधील ऊर्जेचं संतुलन बिघडू शकतं, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे.

किचनसाठी कोणते रंग शुभ मानले जातात?

किचनमध्ये नेहमी हलक्या रंगांचा वापर करावा, असा वास्तुशास्त्राचा सल्ला आहे. यामध्ये पांढरा, क्रीम, हलका पिवळा, हलका हिरवा, फिकट राखाडी आणि हलका निळा या रंगांचा समावेश होतो. हे रंग डोळ्यांना त्रास देत नाहीत. त्याचप्रमाणे या रंगांमुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होत नाही, असं वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे किचनच्या भिंती, कपाटं आणि इतर वस्तूंसाठी हलक्या रंगांची निवड करावी.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat : बारीक शरीर अन् सुटलेले पोट! केवळ चरबीच नाही, 'ही' ६ कारणेही असू शकतात जबाबदार

Maharashtra News Live Update: मावळमध्ये डी-मार्टवर FDA ची धडक कारवाई

Male Fertility: बाबा व्हायचंय? मग पुरुषांनी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर'चं नाव बदलणार? शिंदेंच्या नेत्याचं मोठं विधान

EPFO Update : EPFO चा मोठा निर्णय! रिटायर्डमेंटनंतर PF मधील रक्कम टप्प्याटप्प्याने काढता येणार, काय आहे SWP योजना?

SCROLL FOR NEXT