Belly Fat : बारीक शरीर अन् सुटलेले पोट! केवळ चरबीच नाही, 'ही' ६ कारणेही असू शकतात जबाबदार

Shreya Maskar

वजन कमी पण पोट दिसते

अनेकदा शरीराचे वजन कमी असते, मात्र पोटाचा भाग बाहेर आलेला दिसतो. अशा वेळी अनेकजण पोटावरील चरबी वाढली आहे असे समजून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र वजन कमी असूनही पोट बाहेर दिसण्यामागे केवळ चरबी हेच कारण नसून इतरही आरोग्याच्या समस्या कारणीभूत ठरतात.

Weight less but belly visible | pinterest

पोटाच्या आतील भागात चरबी जमा होणे

शरीराचे एकूण वजन कमी असले तरी पोटाच्या आतील अवयवांभोवती चरबी जमा होऊ शकते. या चरबीला व्हिसरल फॅट म्हणतात. ही चरबी यकृत, आतडे आणि इतर अवयवांच्या आसपास साठते. त्यामुळे व्यक्तीचे हात-पाय बारीक दिसत असले तरी पोट पुढे आलेले दिसू शकते.

inner part of the abdomen | pinterest

पोट फुगण्याची समस्या

काही लोकांचे सकाळी पोट सपाट दिसते; मात्र जेवणानंतर पोट फुगल्यासारखे दिसू लागते. यामागे गॅस, अपचन किंवा काही पदार्थ न पचणे ही कारणे असू शकतात.

Bloating problem | pinterest

बद्धकोष्ठतेचा त्रास

पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर आतड्यांमध्ये मल साचून राहू शकतो. यामुळे पोट फुगणे, जडपणा जाणवणे आणि पोटाचा आकार वाढल्यासारखा दिसणे अशा समस्या उद्भवतात.

constipation | pinterest

शरीराची चुकीची ठेवण

सतत वाकून बसणे, चालताना पाठ पुढे झुकवणे किंवा बराच वेळ एकाच स्थितीत बसून राहणे यामुळे शरीराची ठेवण बदलू शकते. पाठीचा कणा आणि श्रोणीची स्थिती बदलल्यामुळे पोटाचा भाग अधिक पुढे आलेला दिसू शकतो.

Improper body posture | pinterest

पोटाचे स्नायू कमकुवत होणे

पोट आणि कंबरेभोवतीचे स्नायू शरीराला आधार देण्याचे काम करतात. या स्नायूंना पुरेसा व्यायाम न मिळाल्यास ते कमकुवत होऊ शकतात. परिणामी शरीराची ठेवण बिघडू शकते आणि पोटाचा भाग पुढे आलेला दिसू शकतो.

Abdominal muscle weakness | pinterest

हार्मोन्समधील बदल

शरीरातील हार्मोन्समधील बदलांचाही पोटाच्या आकारावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळीच्या आधी होणारे हार्मोनल बदल, रजोनिवृत्ती आणि काही वैद्यकीय स्थितींमुळे पोट फुगणे किंवा पोटाभोवती चरबी जमा होण्याची शक्यता असते.

Changes in hormones | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : कडाक्याच्या थंडीतही शरीर राहील उबदार, आवर्जून खा 'या' ५ भाज्या

Winter Vegetables | AI PHOTO
येथे क्लिक करा...