EPFO Update : EPFO चा मोठा निर्णय! रिटायर्डमेंटनंतर PF मधील रक्कम टप्प्याटप्प्याने काढता येणार, काय आहे SWP योजना?

EPFO Update News : EPFO ने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन SWP योजना मंजूर केली आहे. आता PF चे पैसे एकरकमी न काढता मासिक, तिमाही किंवा सहामाही हप्त्यांमध्ये काढता येणार. जाणून घ्या नवीन योजनेचे फायदे आणि नियम.
Epfo news update
Epfo news updateAI Image
Published On: 
Summary
  • EPFO ने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी SWP प्रस्तावाला मंजुरी

  • 19 नोव्हेंबर 2026 रोजी झालेल्या 240 व्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

  • PF ची संपूर्ण रक्कम एकरकमी काढण्याऐवजी मासिक, तिमाही किंवा सहामाही हप्त्यांमध्ये काढता येणार

  • खात्यात शिल्लक राहिलेल्या रकमेवर परतावा मिळत राहणार

खासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. निवृत्तीनंतर PFचे पैसे एकाच वेळी काढण्याऐवजी आता ते टप्प्याटप्प्याने काढण्याची सुविधा मिळू शकते. EPFOने सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन (SWP) या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे. 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

काय आहे ही नवीन सुविधा?

सध्या कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर आपल्या PF खात्यात जमा असलेली रक्कम एकरकमी काढू शकतात. मात्र, नव्या SWP सुविधेमुळे संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याची गरज राहणार नाही. कर्मचारी आपल्या गरजेनुसार दर महिन्याला, तीन महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा ठरावीक रक्कम काढू शकतील. विशेष म्हणजे, खात्यात शिल्लक राहिलेल्या पैशांवर व्याज मिळत राहणार आहे.

Epfo news update
Cyclone Alert : बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ चक्रीवादळ तीव्र, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मुसळधार पाऊस

कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार?

निवृत्तीनंतर अनेकांना उत्पन्नाची गरज असते. अशा वेळी PF मधील संपूर्ण रक्कम खर्च होण्याऐवजी ती खात्यात ठेवून गरजेनुसार पैसे काढता येतील. यामुळे निवृत्तीनंतरच्या खर्चाचे नियोजन करणे सोपे होऊ शकते. काही रक्कम एकदम काढून उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये घेण्याचाही पर्याय मिळू शकतो. तसेच केवळ व्याजाची रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Epfo news update
HSC Exam Timetable : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! अर्थशास्त्राच्या परीक्षेच्या वेळेत बदल; वाचा वेळापत्रक

50 लाखांच्या PF वर किती पैसे मिळू शकतात?

EPFO च्या अंदाजानुसार, 50 लाख रुपयांच्या निवृत्ती निधीवर वेगवेगळ्या पर्यायांमध्ये मिळणारी रक्कम वेगळी असू शकते. बँकेच्या FD मध्ये 7 टक्के व्याजदराने दरमहा सुमारे 32,492 रुपये मिळू शकतात. कमर्शियल अ‍ॅन्युइटीमध्ये 6 टक्के दराने सुमारे 30,637 रुपये मिळू शकतात. तर EPF SWP मध्ये 8 टक्के दर गृहीत धरल्यास दरमहा सुमारे 41,822 रुपये मिळू शकतात.मात्र, हे आकडे केवळ अंदाज आहेत. प्रत्यक्ष मिळणारी रक्कम व्याजदर आणि योजनेच्या अंतिम नियमांवर अवलंबून असेल. त्यामुळे निवृत्तीनंतर PF मधून नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.