dog scratch rabies google
लाईफस्टाईल

धक्कादायक! कुत्र्याच्या ओरखड्यामुळे ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, नालासोपाऱ्यातील घटना

Rabies Alert: नालासोपाऱ्यात कुत्र्याच्या किरकोळ ओरखड्यामुळे ९ वर्षांच्या मुलीचा रेबीजने मृत्यू झाला. वेळेवर उपचार न घेतल्याने धोका वाढतो. लक्षणे ओळखा आणि त्वरित लस घेणे अत्यावश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

अनेकांना प्राणी प्रचंड आवडतात. जर एखाद्या घरामध्ये लहान मुल असेल त्यांना प्राणी खूप आकर्षित करतात. पण हेच प्राणी त्यांच्या जीवावर सुद्धा बेतू शकतात. कारण नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटली आणि पुन्हा भटक्यांचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला. नालासोपाऱ्यामध्ये एका ९ वर्षाच्या चिमुरडीला कुत्र्याने नखं मारली. त्यामुळे तिला रेबीजच्या संसर्गाला सामोरं जावं लागलं. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

नालासोपारा पश्चिम येथील सुबोध सागर इमारतीत राहणारी ही ९ वर्षीय कशिश सहानी चिमुरडी होती. जवळपास सहा महिन्यांपूर्वी कशिशला एका कुत्र्याच्या नखांचा किरकोळ ओरखडा लागला होता. ती छोटा जखम असल्यामुळे सुरुवातीला त्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही. पणनंतर काही दिवसांपूर्वी अचानक तिची प्रकृती बिघडली. तिने जेवण-पाणी बंद केलं, डोळे लाल झाले होते आणि तिची अस्वस्थता वाढली होती. मग तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि नंतर पुढच्या उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं. दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही पालकांना हादरवून टाकणारी गोष्ट आहे. पुढे आपण मुलांना रेबीजपासून कसं वाचवायचं? याबद्दस काही माहिती जाणून घेणार आहोत.

रेबीज हा कोणत्याही प्राण्यांच्या चावण्याने किंवा ओरखड्याने पसरणारा विषारी आजार आहे. हा विषाणू मेंदूवर परिणाम करतो आणि वेळेत उपचार घेतले नाहीत तर त्याचा शेवट हा मृत्यूने होतो. जर तुमच्या घरी १० वर्षाखालील मुलं असतील तर पुढील रेबीजची लक्षणे आत्ताच जाणून घ्या.

1. ताप, अशक्तपणा

2. चिडचिड, अस्वस्थता

3. पाणी पाहून भीती वाटणे (Hydrophobia)

4. जखमेच्या जागी खाज, जळजळ

5. अन्न-पाणी न घेणे, भूक नसणे

6. झटके येणे किंवा वर्तनात बदल

कुत्रा चावल्यावर पहिल्यांदा काय केले पाहिजे?

जेव्हा तुम्हाला कुत्रा चावतो, तेव्हा जखम 15 मिनिटांच्या आत साबणाने आणि पाण्याने धुवा. मग जखमेवर अँटिसेप्टिक लावा. तुम्हाला जर उपचार जमत नसतील. तर लगेचच डॉक्टरांकडे जा. कारण उशीर केल्याने मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. Anti-rabies vaccine (ARV) आणि Immunoglobulin डॉक्टरांच्या सल्याने घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा; सामन्याच्या मानधनात तब्बल 50 टक्के कपात, अचानक नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हिंगोलीत ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक

Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर' यशस्वी की अयशस्वी? उद्या ठाकरेसेना घेणार मोठा निर्णय

PM Modi- Donald Trump: PM मोदींसमोरच डोनाल्ड ट्रम्प यांचं ठोस आश्वासन; म्हणाले, भारतावर हल्ला झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत...

Operation Manjar: ऑपरेशन टायगरनंतर महाराष्ट्रात सुरू होणार 'ऑपरेशन मांजर', एकनाथ शिंदेवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT