Sakshi Sunil Jadhav
उन्हाळ्यात घाम आणि उष्णतेमुळे त्वचा ऑयली होते असं आपण समजतो. पण अनेकांना या दिवसांतही त्वचा कोरडी पडण्याची समस्या जाणवते. यामुळे त्वचा निस्तेज दिसते आणि खाज येते. काही घरगुती उपाय तुमच्या त्वचेला पुन्हा मऊ बनवू शकतात.
उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे खूप गरजेचं आहे. दिवसाला किमान 8-10 ग्लास पाणी प्या.
नारळाचं तेल त्वचेला नैसर्गिक मॉइश्चर देतं. हे रात्री झोपण्यापूर्वी हलक्या हाताने त्वचेला लावा.
अॅलोवेरा त्वचेला थंडावा देऊन कोरडेपणा कमी करते. रोज वापरल्यावर त्वचा मऊ राहते.
दही त्वचेला हायड्रेट करते तर मध त्वचा मऊ ठेवतो. आठवड्यातून 2 वेळा वापरा.
जास्त गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकते. त्यामुळे कोमट पाणी वापरा.
हार्श केमिकल्स असलेले प्रॉडक्ट्स वापरु नका. सौम्य आणि मॉइश्चरायझिंग फेसवॉश निवडा. अंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा ओलसर राहते.
उन्हामुळे त्वचा कोरडी आणि डॅमेज होते. बाहेर पडताना SPF असलेला सनस्क्रीन लावा.