भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी
Child Heart Attack : हार्ट अटॅकमुळे उतारवयातील नागरिकांचा मृत्यू होतो, असं मानलं जायचं.. मात्र आता हार्ट अटॅकमुळे अवघ्या 8 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय.. ही घटना कुठे घडलीय? याबरोबरच इतक्या कमी वयातील चिमुकल्यांना हार्ट अटॅकचा धोका का आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
ही आहे 8 वर्षांची चिमुकली गार्गी.. इयत्ता तिसरीची विद्यार्थीनी..तिचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला आणि सगळा पालक वर्गच हादरून गेलाय.. त्याचं झालं असं की, सकाळी 8 च्या सुमारास गार्गी शाळेत पोहचली... शाळेच्या पायऱ्या चढली आणि शाळेच्या व्हरांड्यात चालू लागली.. तेव्हा तिला अचानक अस्वस्थ वाटू लागलं... ती थांबली... पुन्हा चालू लागली आणि लॉबीतील बाकावर बसली. पुढे काही सेकंदातच गार्गी कोसळली...
गार्गी हात पाय झाडत होती.. तेव्हा समोर असलेल्या शिक्षिकांनी तिला पाहिलं आणि धावत जाऊन गार्गीला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला.. गार्गीला हॉस्पिटलला नेण्यात आलं.. मात्र त्याआधीच गार्गीचा मृत्यू झाला होता.... 8 वर्षांच्या चिमुकल्यांना हार्ट अटॅक येण्याची ही पहिलीच घटना नाही.. तर याआधी कर्नाटकमध्येही 8 वर्षाच्या तेजस्विनीचा असाच हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता... शाळेत शिक्षिकेला वही दाखवत असतानाच तेजस्विनी कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. अशाच प्रकारे जगभरात तब्बल 37 लाख चिमुकल्यांना हृदयविकाराचा धोका असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलाय...
WHO च्या अहवालात नेमकं काय?
WHO च्या अहवालानुसार 37 लाख मुलांना हृदयविकाराचा धोका
5 वर्षाखालील 37 लाख मुलांचं वजन जास्त
शाळेचा ताण, अपुऱ्या झोपेमुळे मुलांचं हृदय कमकुवत बनू शकतं
जंक फूडमुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो
खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे हृदयविकाराचा धोका
चिमुकल्या मुलांना हृदयविकाराचा झटका येण्याची नेमकी कारणं काय आहेत? याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिलीय...
निरोगी जीवनशैलीसाठी पालकांनी मुलांना व्यायामाची सवय लावणं गरजेचं आहे..त्याबरोबरच हृदयविकार अनुवंशिक कारणामुळेही होऊ शकत असल्याने वेळोवेळी तपासण्या करणं गरजेचं आहे. भविष्यातील पिढीचं हृदय सुदृढ ठेवायचं असेल तर पालकांनी लहानपणापासूनच मुलांना योग्य सवयी लावायला हव्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.