Women diagnosed with Breast Cancer saam tv
लाईफस्टाईल

Cancer Deaths : धक्कादायक! दर मिनिटाला एका महिलेचा 'या' कॅन्सरने मृत्यू; WHO च्या रिपोर्टमधून मोठा दावा

1 in 20 Women diagnosed with Breast Cancer: जागतिक आरोग्य संघटनेने स्तनाच्या कॅन्सरबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूंबद्दल चिंता व्यक्त केलीये. जागतिक आरोग्य संघटनेने नुकतंच एक अहवाल सादर केला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर हा शब्द जरी म्हटलं तरी अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे या आजारांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. दरम्यान अशातच जागतिक आरोग्य संघटनेने स्तनाच्या कॅन्सरबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूंबद्दल चिंता व्यक्त केलीये. जागतिक आरोग्य संघटनेने नुकतंच एक अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरबाबत इशारा दिला आहे.

येत्या काही वर्षांत जगभरात स्तनाच्या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढेल, असा अंदाज WHO ची कॅन्सर संस्था आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) यांनी व्यक्त केलाय. या अभ्यासातून असं दिसून आलंय की, जगात दर मिनिटाला एका महिलेचा ब्रेस्ट कॅन्सरने मृत्यू होतोय. WHO ने देखील याची अनेक कारणं दिलीयेत. यामध्ये खाण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली आणि वाढतं वय यासारख्या अनेक समस्यांचा समावेश आहे.

WHO च्या कॅन्सर एजन्सी आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) चा हा रिपोर्ट नेचर मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. एका नवीन रिपोर्टमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या या वाढत्या घटनांबद्दल इशारा देण्यात आला आहे.

ब्रेस्ट कॅन्सरची धक्कादायक आकडेवारी

जागतिक आरोग्य संघटनेची कॅन्सर एजन्सी आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) यांनी म्हटलंय की, २०५० पर्यंत जगभरात स्तनाच्या कॅन्सरचं निदान आणि मृत्यू वाढण्याची अपेक्षा आहे. IARC च्या एका अभ्यासानुसार, २०२२ मध्ये, जगभरात सुमारे २.३ दशलक्ष महिलांवर ब्रेस्ट कॅन्सरबाबत उपचार करण्यात आले. ज्यामध्ये ६,७०,००० महिलांचा मृत्यू झाला.

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, पुढील २५ वर्षांत कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ३८ टक्के वाढ आणि मृत्यूंमध्ये ६८ टक्के वाढ होऊ शकते. हा आजार याच वेगाने पसरत राहिला तर २०५० पर्यंत जगभरात दरवर्षी ३२ लाख नवीन रुग्ण आणि १.१ दशलक्ष मृत्यू होतील. जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये आणि मृत्यूंमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. त्याचा परिणाम विशेषतः भारत आणि इतर विकसनशील देशांवर अधिक दिसून येईल.

आयएआरसीच्या शास्त्रज्ञ डॉ. जोन किम म्हणाल्या, “दर मिनिटाला, जगभरात चार महिला ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेतायत. दर याचवेळी एका महिलेचा या आजाराने मृत्यू होतो. तर येत्या काळात जगभरातील प्रत्येक २० महिलांपैकी एका महिलेला तिच्या आयुष्यात कधीतरी ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका संभवतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT