Shravan Special sAAM TV
लाईफस्टाईल

Shravan Special : शिवभक्तांनो दूर कशाला? मुंबईत अनुभवा अद्भुत भक्ती, श्रावणात करा शिव मंदिरांची सफर

Shiva Temples In Mumbai : श्रावण महिन्यात सर्वत्र भक्तीचे वातावरण पाहायला मिळतं. अशात तुम्ही सुद्धा मुंबईतील 'या' प्रसिद्ध शिव मंदिरांना भेट द्या आणि मंत्रमुग्ध व्हा.

Shreya Maskar

यंदा श्रावणात कामाच्या व्यापामुळे बाहेर कुठे जाता येत नसल्यास, मुंबईतच महादेवाचे दर्शन घ्या. मुंबईला देखील मोठा भक्तीमय वारसा लाभला आहे. श्रावणात तुमच्या कुटुंबासोबत मुंबईतील प्रसिद्ध शंकराच्या मंदिरांना भेट द्या.

बाबुलनाथ मंदिर

मुंबईतील सर्वात प्राचीन मंदिर म्हणजे बाबुलनाथ मंदिर. हे मंदिर गिरगाव चौपाटीपासून जवळ आहे. येथे महाशिवरात्री श्रावणाला खूप गर्दी पाहायला मिळते. भाविक मोठ्या संख्येने येतात. अनेक कार्यक्रम सणांच्या दिवशी येथे साजरे केले जातात. येथे गेल्यावर मनाला एक वेगळी शांती मिळते. हे मंदिर भव्य आहे. येथे तुम्ही मंत्रमुग्ध करणारे वातावरण अनुभवाल.

पिंपळेश्वर शिव मंदिर

श्री पिंपळेश्वर शिव मंदिर हे नवी मुंबई येथे आहे. श्रावणात येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. हे मंदिर पिंपळेश्वर महादेव मंदिर आणि रामेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार , हे १०० वर्ष जुने मंदिर आहे. यथे पिंपळाची झाडे पाहायला मिळतील. श्रावणी सोमवारी अनेक शिवभक्त येथे आवर्जून येतात.

वाळकेश्वर मंदिर

वाळकेश्वर मंदिर हे दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध शिव मंदिर आहे. हे मलबार हिल या भागात येते. वाळकेश्वर मंदिर बाणगंगा मंदिर या नावाने देखील ओळखले जाते. पारंपारिक हिंदू शैलीमध्ये या मंदिराची रचना आहे. या मंदिरातील महादेवाची पिंड प्रसिद्ध आहे. श्रावणात या मंदिरात अनेक लोक आशीर्वादासाठी येतात.

अंबरनाथ मंदिर

अंबरनाथ मंदिर हे मुंबईतील प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिरातील महादेवाला अंबरेश्वर म्हणून ओळखले जाते. श्रावणात या मंदिरात शंकराच्या भक्तीत तल्लीन झालेली लोक पाहायला मिळतात. तसेच येथे विविध कार्यक्रम देखील होतात. येथील वातावरण मनाला मंत्रमुग्ध करून टाकते.

चक्रेश्वर महादेव मंदिर

चक्रेश्वर महादेव मंदिर हे मुंबईतील शंकराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराला पौराणिक वारसा आहे. हे मंदिर पर्यटकांचे आकर्षण आहे. श्रावणात येथील मंदिर दिव्यांनी उजळून निघते. श्रावणात तुम्ही सुद्धा आवर्जून या मंदिरांना भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT