स्त्रियांना नेहमीच मुलांच्या टिफिनची खूप चिंता असते. आजच्या या नव्या जनरेशनमध्ये मुलांना पिझ्झा, बर्गर,यांसारखे पदार्थ खायला आवडत असतात. रोज-रोज पिझ्झा, बर्गरचे सेवन केल्याने आरोग्यावर परिणाम होतो. बाहेरचे पदार्थ खाल्याने आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
म्हणून प्रत्येक आईला असे वाटत असते की, आपल्या मुलांच्या जेवणामध्ये सगळ्या पोषक घटकांचा समावेश असायला हवा. त्याचबरोबर शाळेच्या टिफिनमध्ये मुलांना रोज काय नवीन पदार्थ बनवून द्यायचा हा प्रश्न पडत असतो. ज्याने मुलांना पौष्टिक घटके मिळतील. प्रत्येक आईची ही चिंता सोडवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी शेंगदाण्याच्या पोळीची रेसिपी आणली आहे.
गव्हाचं पीठ
१ कप शेंगदाणे
तूप/ तेल
गुळ
प्रथम गॅस ऑन करुन त्यावर कढई ठेवा. त्यात शेंगदाणे टाकून त्यांना भाजून घ्या. त्यानंतर गॅस बंद करुन शेंगदाण्यांना थंड करुन त्यांची साल काढून घ्या. साल काढलेल्या शेंगदाण्यांमध्ये गुळ टाकून घ्या. हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये भरुन थोडे जाड-बारीक असे फिरवून घ्या. त्यानंतर एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्या आणि पोळ्यांची कणीक कशी मळतो तशी मळून घ्या. त्यानंतर त्या कणीकला १० मिनिटे मुरु द्या. मुरुलेल्या कणीकचे छोटे गोळे तयार करुन घ्या. त्यानंतर हाताच्या साहाय्याने एक एक गोळाच्या आतमध्ये शेंगदाण्याचे मिश्रण भरा.
शेंगदाण्याच्या मिश्रणांनी भरलेल्या या गोळ्यांना वरुन पीठ लावा. त्यानंतर त्या एक एक गोळ्याची पोळी पोळपाटावर लाटून घ्या. त्यानंतर गॅसवर तवा ठेवून मध्यम आचेवर लाटलेली पोळी तूप किंवा तेल टाकून दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्या. अशा प्रकारे पौष्टिक असणारी शेंगदाण्याची पोळी तयार झाली आहे. तुम्ही या पोळीला दह्यासोबत सर्व्ह करु शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.