Shardiya Navratri Day 6 Saam Tv
लाईफस्टाईल

Shardiya Navratri Day 6 : नवरात्रीत सहावी माळ देवी कात्यायनीची, दुःखावर मात मिळवण्यासाठी अशी करा पूजा

Shraddha Thik

Shardiya Navratri :

हिंदू शास्त्रानुसार, शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी आई कात्यायनीची पूजा केली जाते. यावर्षी षष्ठी तिथी 20 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. माता कात्यायनी ही ब्रह्मदेवाची मानस कन्या म्हणूनही ओळखली जाते.

माता कात्यायनीचे रूप सर्वात सुंदर आहे आणि तिला बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये छठ मैया म्हणून देखील ओळखले जाते. मान्यतेनुसार, नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनीच्या अनुष्ठानाने भाविकांना विशेष लाभ होतो. माता कात्यायनीचे रूप, पूजा पद्धत, पूजा मंत्र आणि आरती जाणून घ्या-

कात्यायनी देवींचे रूप

शास्त्रानुसार मातेचे रूप सोन्यासारखे तेजस्वी असून तिला चार हात आहेत. प्रत्येक हातामध्ये मातेने तलवार, कमळ, अभय मुद्रा आणि वर मुद्रा धारण केली आहे. कात्यायनी देवीला लाल रंग सर्वात जास्त आवडतो. पौराणिक कथांनुसार, महर्षी कात्यायन यांच्या तपश्चर्येनंतर माता कात्यायनी त्यांच्या कन्या (Girl) म्हणून जन्माला आली. या रूपात माता दुर्गेने महिषासुराचा वध करून देव आणि मानवांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले होते. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देवी कात्यायनी पूजा विधि

नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी सर्वप्रथम स्नान आणि ध्यानानंतर कलश पूजन करावे आणि त्यानंतर माता दुर्गा आणि माता कात्यायनी यांची पूजा करावी. पूजा सुरू करण्यापूर्वी मातेचे स्मरण करून हातात फुले घेऊन अर्पण करावी. त्यानंतर देवीला कुमकुम, अक्षता, फुले इत्यादी सोळा अलंकार अर्पण करावेत. त्यानंतर, देवीला आवडणारे मध अर्पण करा आणि मिठाई (Sweets) इ. यानंतर तुपाचा दिवा लावावा आणि देवीची आरती करावी. आरतीपूर्वी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशती वाचायला विसरू नका.

या मंत्रांचा जप करा

1. या देवी सर्वभूतेषु माँ कात्यायनी रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

2.चंद्र हासोज्जवलकरा शार्दूलवर वाहना|

कात्यायनी शुभंदद्या देवी दानवघातिनि||

देवी कात्यायनीची आरती

जय-जय अम्बे जय कात्यायनी

जय जगमाता जग की महारानी

बैजनाथ स्थान तुम्हारा

वहा वरदाती नाम पुकारा

कई नाम है कई धाम है

यह स्थान भी तो सुखधाम है

हर मंदिर में ज्योत तुम्हारी

कही योगेश्वरी महिमा न्यारी

हर जगह उत्सव होते रहते

हर मंदिर में भगत हैं कहते

कत्यानी रक्षक काया की

ग्रंथि काटे मोह माया की

झूठे मोह से छुडाने वाली

अपना नाम जपाने वाली

बृहस्पतिवार को पूजा करिए

ध्यान कात्यायनी का धरिए

हर संकट को दूर करेगी

भंडारे भरपूर करेगी

जो भी मां को 'चमन' पुकारे

कात्यायनी सब कष्ट निवारे।।

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT