Shardiya Navratri 2023 : कोल्हापूरची अंबाबाई ते वैष्णो देवी... देशभरात प्रसिद्ध आहेत नवदुर्गेची ही मंदिरे; दर्शन घ्या

Mata Durga Famous Temples In India : नवरात्र हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. जो देशाच्या अनेक शहरात थाटामाटात साजरा केला जातो.
Shardiya Navratri 2023
Shardiya Navratri 2023Saam Tv
Published On

Shardiya Navratri :

नवरात्र हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. जो देशाच्या अनेक शहरात थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गा देवीचे भक्त नऊ दिवस उपवास करतात आणि पूजा करतात. तसेच, या काळात लोक माता दुर्गेच्या मंदिरांनाही भेट देतात. या नवरात्रीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला भारतातील दुर्गेच्या काही खास मंदिरांबद्दल सांगणार आहोत. या मंदिरांची स्वतःची एक खास श्रद्धा आहे आणि या मंदिरात गेल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया -

वैष्णो देवी मंदिर - हे भारतातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक आहे. जिथे जगभरातून हिंदू भाविक येतात. जम्मू-काश्मीरच्या कटरा जिल्ह्यात असलेल्या या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते. असे मानले जाते की देवी दुर्गा येथे खडकांच्या रूपात गुहेत निवास करते. हे मंदिर (Temple) कटरा पासून 13 किलोमीटर अंतरावर आहे.

त्रिपुरा सुंदरी मंदिर - हिंदू पौराणिक कथेनुसार सतीचा उजवा पाय ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यातील उदयपूर (पूर्वीचे रंगमती म्हणून ओळखले जाणारे) शहरात आहे. या मंदिरात काली मातेची सोरोशी रूपात पूजा (Puja) केली जाते.

मंगला गौरी मंदिर, गया (बिहार) - प्रचलित मान्यतेनुसार, देवी सतीचे स्तन पडले तेथे आज मंगला गौरी मंदिर आहे. हे मंदिर गया येथील प्रसिद्ध धार्मिक (Religious) स्थळांपैकी एक आहे. तसेच नवरात्रोत्सवादरम्यान येथे भाविकांची मोठी गर्दी दिसून येते.

Shardiya Navratri 2023
Shardiya Navratri 2023 : उपवासात गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोय? दिवसाची सुरुवात या गोष्टींनी करा

दंतेश्वरी मंदिर, छत्तीसगड - दंतेवाडाचे प्रसिद्ध दंतेश्वरी मंदिर छत्तीसगडच्या बस्तर भागात आहे. सुंदर खोऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे मंदिर खूप जुने आहे. असे मानले जाते की येथे सतीचा दात पडला होता, त्यामुळे या स्थानाचे नाव दंतेश्वरी पडले.

दुर्गा मंदिर, वाराणसी - हे मंदिर रामनगरमध्ये आहे. असे मानले जाते की हे मंदिर 18 व्या शतकात बंगाली राणीने बांधले होते हे मंदिर भारतीय स्थापत्यकलेतील उत्तर भारतीय शैलीतील नागरा शैलीत बांधले आहे. या मंदिरात चौकोनी आकाराचे तळे असून ते दुर्गा कुंड म्हणून ओळखले जाते. या इमारतीला गेरूच्या अर्काने लाल रंग दिला आहे. मंदिरातील देवीची वस्त्रेही गेरू रंगाची आहेत. एका मान्यतेनुसार, या मंदिरात स्थापित केलेली मूर्ती माणसाने बनवली नसून ही मूर्ती स्वतः प्रकट झाली होती, जी लोकांचे वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यासाठी आली होती. नवरात्री आणि इतर सणांमध्ये हजारो भाविक या मंदिराला भक्तिभावाने भेट देतात.

Shardiya Navratri 2023
Shardiya Navratri Travel Plan : दुर्गापूजा ते गरबा! भारतातील 'या' शहरात नवरात्रीचा जल्लोष, फिरण्याचा करा प्लान

श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर - श्री महालक्ष्मी मंदिर हे विविध शक्तीपीठांपैकी एक आहे आणि ते कोल्हापूर, महाराष्ट्र येथे आहे. येथे कोणताही भक्त आपल्या मनोकामना घेऊन येतो, आईच्या आशीर्वादाने ती इच्छा पूर्ण होते. भगवान विष्णूची पत्नी असल्याने या मंदिराला माता महालक्ष्मी असे नाव पडले.

नैना देवी मंदिर, नैनिताल - नैनीतालमधील नैनी तलावाच्या उत्तरेकडील किनारी नैना देवी मंदिर आहे. 1880 मध्ये भूस्खलनाने हे मंदिर उद्ध्वस्त झाले. नंतर त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. येथे सतीच्या शक्तीरूपाची पूजा केली जाते. मंदिरात दोन डोळे आहेत, जे नैना देवीचे प्रतिनिधित्व करतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com