Shardiya Navratri 2022
Shardiya Navratri 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Shardiya Navratri 2022 : नवरात्रीच्या काळात उपवास करताय ? 'या' फळांचे सेवन करा, राहाल दिवसभर ऊर्जात्मक

कोमल दामुद्रे

Shardiya Navratri 2022 : नवरात्रीची काळ सुरु झाला की, नवदुर्गेची अगदी भक्तीभावाने पूजा केली जाते. आजपासून नवरात्रौत्सव सुरू झाला आहे. या नऊ दिवसात अनेक भाविकांचा उपवास असतो. नऊ दिवस काही न खाल्ल्याने किंवा दिवसभर ऊर्जात्मक पदार्थांचे सेवन न केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या आहारात काही विशिष्ट पाणीदार व ऊर्जात्मक फळांचा समावेश करायला हवा. ज्यामुळे आपल्याला शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहिल व अशक्तपणा येणार नाही.

त्यासाठी आपल्या शरीराला पुरेसे पाणी मिळणाऱ्या फळांचा आहारात समावेश करायला हवा. आज आम्ही तुम्हाला काही लेखांमध्ये अशाच काही फळांबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन उपवासात केल्याने तुम्हाला शारीरिक कमजोरी जाणवणार नाही.

१. नवरात्रीत सफरचंदाचे सेवन केल्यास शरीराला भरपूर फायबर मिळेल. यासोबतच यामध्ये कार्बोहायड्रेट्स देखील असतात, ज्यामुळे शरीर ऊर्जावान राहते. जर तुम्ही ९ दिवस उपवास करत असाल तर नवरात्रीत सफरचंदाचे सेवन जरूर करा.

२. ब्लूबेरीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. याशिवाय त्यात पाणीही मोठ्या प्रमाणात असते. जर तुम्हाला उपवासात उत्साही राहायचे असेल तर तुमच्या आहारात ब्लूबेरीचा समावेश करा. तसेच, तुम्ही अनेक शारीरिक समस्यांपासून दूर राहाल.

३. संत्री हे जीवनसत्त्व (Vitamins) क चा खूप चांगला स्त्रोत आहे, ज्याचे सेवन करून तुम्ही शरीर तंदुरुस्त ठेवू शकता. याशिवाय संत्र्यामध्ये पाणी आणि फायबर देखील असतात जे तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात. नवरात्रीत उपवास (Fast) करत असाल तर संत्री नक्की खा.

४. आलुबुखार खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. यासोबतच तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स मिळतात, ज्यामुळे तुम्हाला शारीरिक कमजोरी जाणवत नाही. उपवासात शरीर निरोगी ठेवायचे असेल तर आलुबुखार खा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Today's Marathi News Live : नरेंद्र मोदींची पुण्यात सभा, अमित ठाकरे सभेसाठी रवाना

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतीगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला अर्ज?

SCROLL FOR NEXT