शाहिद कपूर हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे नुकताच त्याच्या 'ओ रोमियो' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यावर त्याच्या चर्चा फार रंगल्या आहेत. तर तरुण मंडळी त्याचे फिटनेस रुटीन फॉलो करण्याकडे भर देत आहेत. कारण या अभिनेत्याचे वय ४४ वर्षे असे आहे. तरीही तो इतका सुंदर फिट कसा आहे? यामागचं रहस्य काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
शाहिद कपूर हा बाहेरच्या खाण्याकडे दुर्लक्ष करतो. हे सगळ्यात मोठं गुपित आहे. कारण सध्या लोक लक्झरी लाइफस्टाइल फॉलो करणं पसंत करतात. मग मोठ्या हॉटेल्समध्ये जाऊन सतत खाणं, पिणं, कामानिमित्त बाहेर असल्याने सतत बाहेरचं खाणं, स्ट्रीट फूड्स दर आवड्याला खाणं ही अत्यंत वाईट समस्या आहे. याने तुमचा फॅट तर वाढतोच तर दुसरीकडे मेंदूही कमकुवत होतो. अशावेळेस वेळेस तुम्ही शाहिद सारखं सकाळी घरातून निघताना पोटभर नाश्ता करणं योग्य ठरु शकतं.
शाहिद सकाळी कामाच्या काही तास आधी उठून व्यायाम करणं पसंत करतो. त्यात ब्रिदींग ही पहिली पायरी असते. तर उठल्या उठल्या काहीवेळ शांतपणे मुव्हमेंट करतो. मग काहीवेळाने व्यायाम करतो. त्यातही खूप मर्यादेबाहेर जाऊन व्यायाम करणं तो टाळतो. फक्त फंक्शनल ट्रेनिंग, स्ट्रेंथ वर्क आणि मोबिलिटी एक्सरसाइजचा समावेश तो रोजच्या व्यायामात करतो. त्याने शरीर दिवसभर अॅक्टीव्ह राहण्यास मदत होते.
शाहिद कपूर व्यायामासोबत त्याच्या आहारकडेही लक्ष देतो. त्यात नॉनव्हेज पुर्णपणे टाळतो. त्याऐवजी तो हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, फळ आणि घरगुती जेवणावर जास्त भर देतो. याने पचनाच्या कोणत्याच समस्यांना सामोरं जावं लागत नाही. तर काही पदार्थ खाताना तो एकदम पोटभर घात नाही. तर थोड्या थोड्या अंतराने जेवतो. त्यामुळे दिवसभर हलकं आणि उत्साही वाटतं. तसेच शाहिद कामातून कमीत कमी ६ तास झोप घेण्याचा प्रयत्न करतो. कारण शरीराला कामासोबत आरामाचीही खूप जास्त गरज असते.
शाहिद कपूर हा बॉलिवूडमधला लोकप्रिय आणि बहुगुणी अभिनेता आहे. ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून त्याने मुख्य अभिनेत्याची सुरुवात केली. ‘जब वी मेट’, ‘कमीने’, ‘हैदर’ आणि ‘कबीर सिंग’ या सिनेमांमुळे तो सुपरहिट ठरला.‘हैदर’ आणि ‘कबीर सिंग’मधील भूमिकेसाठी त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. प्रेमकथा, अॅक्शन आणि गंभीर भूमिका साकारण्यात तो आता पारंगत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘फर्ज़ी’ वेबसीरिजमधूनही त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. सध्या त्याच्या आगामी सिनेमांकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.