Kidney Health: BPच्या गोळ्यांचा किडनीवर होतो परिणाम? डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य, लगेचच घ्या जाणून

Blood Pressure: बीपीच्या गोळ्यांमुळे किडनी खराब होते का? मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांनी या गैरसमजावर प्रकाश टाकत उच्च रक्तदाबाचे खरे धोके स्पष्ट केले आहेत.
Hypertension and kidney health
BP medicines kidney effectgoogle
Published On

बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना रक्तदाबाच्या जीवघेण्या समस्येला सामोरं जावं लागतं. पण झालेल्या आजारावर योग्यवेळी उपचार करणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने बीपीच्या गोळ्या घ्यायला सुरुवात करतात. हा आजार बरा होण्यासाठी बऱ्याद दिवसांचा कालावधी लागतो. त्यामध्ये रुग्णांना पत्थ पाळावं लागतं.

काही नियम आणि अटी पाळाव्या लागतात. पण याच कालावधीत अनेकांना शंका येते ती म्हणजे, बीपीच्या गोळ्या घेतल्याने किडनी खराब होते का? याबद्दल पुढील बातमीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पुढे आपण त्याबद्दल जाणून घेऊयात.

मुंबई सेंट्रलचे प्रसिद्ध डॉ. परिन सांगोई यांनी पुढे तुमची शंका दूर केली आहे. त्याचसोबत तुमच्या शरीरावर होणारा परिणाम कसा असेल याबद्दल सांगितले आहे. खरं तर रक्तदाबाची औषधं किडनीचं थेट नुकसान करत नाहीत, याउलट तुम्ही जर या आजावर वेळीच उपचार केले नाहीत तर तुमची किडनी खराब होऊ शकते. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Hypertension and kidney health
Jio Recharge Plan: धमाल! Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, दिवसाला फक्त ५ रुपयांचा खर्च; वाचा संपूर्ण माहिती

जेव्हा रक्तदाब बरेच दिवस वाढलेला असतो तेव्हा किडनीतल्या खूप लहान सूक्ष्म वाहिन्यांचं हळूहळू नुकसान होतं. त्यामुळे रक्तातला कचरा बाहेर काढण्याचं काम किडनी करु शकत नाही. हे काम शरीरात खूप शांतपणे सुरु राहत असतं. आणि ते वर्षानुवर्ष लक्षात येत नाही. त्यामुळे काहींमध्ये हाय ब्लडप्रेशरचा आजार होण्याआधीच किडनीचं नुकसान झालेलं आढळतं.

जेव्हा रक्तदाबासाठी औषधोपचार घेणं सुरु करतात, तेव्हा रोज तपासण्या केल्या जातात. त्यावेळेस किडनीशी संबंधित समस्या समोर येऊ शकतात. यामुळे काही रुग्ण औषधांनाच दोष देतात, पण प्रत्यक्षात हे नुकसान बरेच दिवस नियंत्रणात न राहिलेल्या उच्च रक्तदाबामुळे झालेलं असतं, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Hypertension and kidney health
Thursday Horoscope: रागावर नियंत्रण ठेवा, 5 राशींसाठी सुखाचा दिवस; कामात बढतीचे योग, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com