Sakshi Sunil Jadhav
सध्या लोक बदलत्या लाइफस्टाइलनुसार फिटनेसकडे जास्त लक्ष देत आहेत. प्रत्येकालाच फीट राहणं आवडतंय.
अनेकांना पोटाचा घेर, चरबी, आळस आणि मानसिक शातंतेसाठी जीमचा किंवा योगाचा पर्याय निवडायचा असतो.
पुढे आपण तुमच्या अनेक समस्यांवर योगा जास्त फायदेशीर आहे की जीम याबद्दल तज्ज्ञांचं मत जाणून घेणार आहोत.
मुळात तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी शरीराला अॅक्टीव्ह ठेवणं गरजेचं असतं. याने तुमचा फॅट, डायबेटीज आणि हार्टच्या संबंधित समस्या होत नाहीत.
योगा केल्याने शरीर, मन आणि आत्मा एकत्र येतात. तुम्हाला एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करता येतं आणि नकारात्मकता, निराशा दूर होते.
योगा केल्याने शरीर फ्लेक्जीबल राहतं, ताण कमी होतो आणि तुमचा फॅट हळूहळू कमी होतो. त्यामुळे हा एक चांगला पर्याय आहे.
तसेच जिम एक्सरसाइजमुळे कॅलरी बर्न होतात आणि तुमचे स्नायू मजबूत होतात. याचा फायदा तुम्हाला काहीच दिवसात जाणवतो.
तुम्हाला दर लवकरात लवकर वजन कमी करायचं असेल तर जिम हा चांगला पर्याय आहे. तर तुम्हाला खूप फायदे हवे असतील तर योगा हा पर्याय बेस्ट आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.