ICC World Cup Beverage Ad Saam tv
लाईफस्टाईल

ICC World Cup Beverage Ad: 'थम्‍स अप उठा, इंडिया इंडिया मचा'! ICC वर्ल्‍ड कपसाठी भारतीय खेळाडूंसोबत शाहरुख खानही सज्ज

Team India : मनात विचार आहे की यंदा ICC World Cup 'भारत जिंकेल का?'

कोमल दामुद्रे

ICC World Cup Match :

थम्‍स अप या कोका-कोला कंपनीने बेव्‍हरेज ब्रॅण्‍डला 'थम्‍स अप उठा, इंडिया इंडिया मचा'च्‍या माध्‍यमातून आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपसोबत त्‍यांच्‍या सहयोगाच्‍या पुढील नवीन चॅप्‍टरची घोषणा करताना आनंद होत आहे.

ही मोहिम अभिमानाने येणाऱ्या वर्ल्‍ड कप मॅचसाठी आपल्या खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी केले जाते. तसेच चाहत्‍यांमध्‍ये भारतीय क्रिकेट संघ आणि ही वर्ल्‍ड कप मॅच यशस्वी ठरेल हा विश्वास आहे.

या मोहिमेअंतर्गत असलेल्‍या जाहिरातीमध्‍ये क्रिकेट आयकॉन्‍स - रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व डायनॅमिक कर्णधार रोहित शर्मा आहे. या जाहिरातीची थीम 'मेकिंग इंडिया बीलीव्‍ह इन टीम इंडिया' आहे. मोहिमेचा उद्देश अद्वितीय कथानकामध्‍ये सामावलेला आहे, तसेच या मोहिमेमध्‍ये 'वॉईस ऑफ बीलीफ' म्‍हणून बॉलीवुड किंग शाहरूख खान आहेत.

जाहिरातीचे कथानक भारतीय क्रिकेटप्रेमींच्‍या सध्‍याच्‍या भावनांना सादर करते, यामध्ये त्यांचा अतूट विश्वास आहे की, 'भारत जिंकणार', पण सोबत मनात विचार आहे की 'भारत जिंकेल का?'. भावनांमधील हा संघर्ष थम्‍स अपच्‍या आयकॉनिक स्प्लिट कॅनवर सुरेखरित्‍या सादर करण्‍यात आला आहे, जो व्हिज्‍युअली डायनॅमिक इंटरप्‍लेचे वर्णन करतो.

आयसीसी वर्ल्‍ड कप (World Cup) कॅम्‍पेनच्‍या नवीन चॅप्‍टरच्‍या लाँचबाबत आपले मत व्‍यक्‍त करत कोका-कोला इंडिया व साऊथ वेस्‍ट एशियाचे उपाध्‍यक्ष अर्णब रॉय म्‍हणाले, ''थम्‍स अपच्‍या आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपसोबतच्‍या सहयोगाचा चाहत्‍यांना सक्षम करण्‍याचा आणि त्‍यांच्‍या मतांना सादर करण्‍यास प्रेरित करण्‍याचा मनसुबा आहे. किंग खान व देशाच्‍या क्रिकेट आयकॉन्‍ससोबतचा आमचा सहयोग चाहत्‍यांचा सहभाग वाढवण्‍याप्रती आमची कटिबद्धता दृढ करतो, तसेच वर्ल्‍ड कप पुन्‍हा मायदेशात आणण्‍यासाठी टीम इंडियाप्रती आमच्‍या अविरत पाठिंब्‍याला दाखवतो. आम्‍ही तज्ज्ञ पॅनेल्‍स व विश्‍वसनीय प्रभावकांकडून तंत्रज्ञान नेतृत्वित, रिअल टाइम प्रतिसादाच्‍या माध्‍यमातून हे ध्‍येय साध्‍य करू, ज्‍यामधून प्रत्‍येकाला आपल्‍या टीमला पाठिंबा देत राहण्‍यास प्रेरणा मिळेल.''

ओगील्‍व्‍ही इंडियाचे चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर सुकेश नायक म्‍हणतात की, ''प्रतिस्‍पर्धी हा बाहेरचा नसतो तो नेहमी आपल्या मनात असतो. कधी-कधी आपल्या स्‍वत:च्‍या मनातील शंका आपली सर्वात मोठी प्रतिस्‍पर्धी बनते. या द्विधा मन:स्थितीवर मात करण्‍यासाठी आपण आपल्‍या अंतर्गत विश्‍वासांवर ठाम राहिले पाहिजे. यंदा वर्ल्‍ड कपसाठी थम्‍स अपने 'भारत (India) यंदा वर्ल्‍ड कप जिंकेल का?' या अंतर्गत संघर्षावर मात करण्‍यासाठी आवाज व प्रतीक म्हणून शाहरूख खान (Shah Rukh Khan) यांची निवड केली आहे.

आयसीसी वर्ल्‍ड कप जवळ येत असताना थम्‍स अपची खेळाडूंच्‍या चिकाटीला प्रशंसित करण्‍याप्रती आणि चाहत्‍यांसाठी संस्‍मरणीय क्षणांची निर्मिती करण्‍याप्रती कटिबद्धता कायम आहे, ज्‍यामुळे अस्‍सल तूफानी वर्ल्‍ड कपसाठी मंच सज्‍ज आहे.'' ब्रॅण्‍डचा आयसीसी वर्ल्‍ड कप २०२३ दरम्‍यान प्रत्‍येक संबंधित संवाद व महत्त्वाच्‍या क्षणामध्‍ये अव्‍वलस्‍थानी राहण्‍याचा उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT