Heart Treatment Cost saam tv
लाईफस्टाईल

Heart Treatment Cost : हार्ट पेशंटना तीव्र झटका; हृदयाच्या आजारांवरील खर्चात वाढ, स्टेंट २ टक्क्यांनी महागले

Cardiac stents Price Hike: सध्या हृदयविकारांचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत हृदयरुग्णांना एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता देशभरात हृदयरोगांवरील उपचारांचा खर्च वाढणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हृदयाच्या आजारांचं प्रमाण सध्या वाढताना दिसतंय. अशातच हृदयरोगींना एक मोठा झटका बसणार आहे. आता देशात हृदयरोग्यांवर उपचार महागणार आहेत. राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने कोरोनरी स्टेंटचं उत्पादन आणि आयात करणाऱ्या कंपन्यांना किंमती वाढवण्यास मान्यता दिली आहे. वाढती महागाई लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

२७ मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात, एनपीपीएने म्हटलं आहे की, ज्या कंपन्यांच्या स्टेंटच्या किरकोळ किमती त्यांनी निश्चित केलेल्या कमाल मर्यादेपेक्षा कमी आहेत, त्या २०२४ च्या घाऊक किंमत निर्देशांकनुसार किमती १.७४०२८% पर्यंत वाढवल्या जाऊ शकतात.

घाऊक किंमत निर्देशांक म्हणजेच Wholesale price index मधील बदलांच्या आधारे, नियामकाने बुधवारी राष्ट्रीय आवश्यक औषधांच्या यादीत समाविष्ट असलेल्या अनुसूचित औषधांच्या किमतीत १.७४% पर्यंत वाढ करण्याची परवानगी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कशावर होणार याचा परिणाम?

या वाढीसह बेअर मेटल स्टेंटची कमाल किंमत आता प्रति युनिट ₹ १०,६९२.६९ होणार आहे. याचसोबत तर ड्रग-एल्युटिंग, बायोमेटॅलिक आणि बायोरेसॉर्बेबल व्हॅस्क्युलर स्कॅफोल्ड (BVS) स्टेंटची कमाल किंमत प्रति युनिट ₹ ३८,९३३.१४ निश्चित करण्यात आलीये .

NPPA केलं स्पष्ट

यावेळी एनपीपीएने स्पष्ट केलंय की, जे उत्पादक निश्चित केलेल्या कमाल किमतीचं पालन करत नाहीत त्यांना ड्रग्स प्राइसेज़ कंट्रोल ऑर्डर २०१३ च्या तरतुदींनुसार व्याजासह वसूल केलेली जास्तीची रक्कम जमा करावी लागणार आहे. एनपीपीएने सर्व किरकोळ विक्रेते आणि डीलर्सना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंमतीची यादी स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हृदयरोगाच्या वाढत्या संख्येचा विचार करता स्टेंटच्या कमाल किमतीत झालेली ही वाढ लक्षणीय मानली जाते.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये ३२,४५७ लोकांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. हा मृत्यूचा आकडा २०२१ मध्ये नोंदवलेल्या २८,४१३ मृत्यूंपेक्षा १२.५% जास्त असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT