Sev Boondi Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Sev Boondi Recipe : घरच्याघरी झटपट बनवा शेव बुंदी; वाचा १० मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Sev Boondi Recipe : पिठाला आवश्यक असेल तितकेच पाणी यामध्ये घ्यावे. त्यानंतर तयार पिठाची छान बारीक शेव तयार करून घ्या.

Ruchika Jadhav

शेव बुंदी हा असा गोड पदार्थ आहे जो प्रत्येक व्यक्तीला आवडतो. कुरकुरीत शेव आणि त्यावर गोड तुपातील बुंदी फार चविष्ट लागते. बुंदी आणि शेव तुम्ही घरी बनवून सुद्धा ठेवू शकता. घरी पाहुणे आल्यावर तुम्ही त्यांना स्विड डिश म्हणून हा गोड पदार्थ देऊ शकता. घरच्याघरी तयार केलेली शेव बुंदी ८ दिवस सुद्धा ताजी राहते. चला तर मग घरच्याघरी शेव बुंदी कशी बनवायची याची माहिती जाणून घेऊ.

साहित्य

२ कप बेसन पीठ

हळद पाव चमचा

मीठ चविनुसार

तेल तळण्यापुरते

खाण्याचा रंग

शेवची कृती

सर्वात आधी शेव बनवण्यासाठी बेसन पीठ घ्या. या पिठात तुमच्या चवीनुसार मीठ मिक्स करा. त्यानंतर यामध्ये खाण्याचा पिवळा रंग किंवा हळद सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता. अशा पद्धतीने पुढे हे पीठ छान मळून घ्या. पिठाचे पातळ बॅटर करायचे नाही. पिठाला आवश्यक असेल तितकेच पाणी यामध्ये घ्यावे. त्यानंतर तयार पिठाची छान बारीक शेव तयार करून घ्या.

चकलीच्या साचामध्ये शेवसाठी देखील जाळी मिळते. ही जाळी या साचावर बसवून घ्या. त्यानंतर मस्त बारीक शेव करून घ्या. शेव थेट कढईमध्ये तेलात सोडा. अशा पद्धतीने बनवलेली शेव मंद आंचेवर तळून घ्या. शेव जास्त करपेल अशी तळायची नाही.अशा पद्धतीने सर्व शेव मस्त तळून घ्या. कुरकुरीत शेव हाताने बारीक चुरून घ्या.

बुंदी बनवण्याची कृती

बुंदी बनवण्यासाठी देखील बेसन पीठ लागेल. बेसन पिठात थोडं मीठ आणि पाणी मिक्स करून हिरवा, पिवळा आणि लाल रंग मिक्स करा. अशा पद्धतीने विविध रंग मिक्स करून याचे छान बॅटर तयार करून घ्या. त्यानंतर तेलात बुंदी तळून घ्या. तसेत एक ग्लास पाणी आणि एक ग्लास साखर टोपात मिक्स करून घ्या. या पाण्याला छान एक उकळी येऊ द्या. उकळी आली की या पाण्यात बुंदी मिक्स करा. बुंदी तयार सर्व पाक शोषून घेते. त्यानंतर बुंदीमध्ये सर्व शेव मिक्स करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : गुरुपुष्यामृताचा योग फलदायी ठरेल, गुंतवणुकीवर अनेक लाभ मिळतील; तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Horoscope Today: काहींना मिळणार प्रेमात धोका, तर काही करतील सुखी संसार; वाचा तुमचे राशीभविष्य

Maharashtra Politics : नकटं असावं, धाकटं नसावं! महायुती-मविआत शिवसेना दोन आकड्यांवर, VIDEO

Cm Shinde: मुख्यमंत्री गुवाहाटीला का जातात? कामाख्या शिंदेंना पावणार?

Madha Constituency : माढ्याचं महाभारत! मतदारसंघात 2 रणजितसिंह आमने-सामने येणार? VIDEO

SCROLL FOR NEXT