ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सणासुदीच्या दिवसांत गोड पदार्थांना फार महत्त्व आहे.
काजू कतली मिठाई लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडत असते.
आज तुमच्या याच आवडीकडे लक्ष देत तुमच्यासाठी काजू कतली रेसिपी घेऊन आलो आहोत.
काजू , साजूक तूप, साखर, सिल्वर वर्क पेपर, वेलची पावडर, पाणी इत्यादी
सर्व प्रथम काजू घेऊन काजूचे बारीक तुकडे करुन घ्या. यानंतर त्या तुकड्यांना मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर तयार करुन घ्या.
दुसऱ्या स्टेपमध्ये गॅस ऑन करुन त्यावर कढई ठेवा. मग त्यात साखर आणि पाणी मिक्स करुन सतत ढवळत राहा. जो पर्यंत साखरेचा पाक घट्ट होत नाही, तो पर्यंत हे मिश्रण ढवळत राहा.
यानंतर गॅस कमी आचेवर करुन त्यात काजूची पावडर , साजूक तूप आणि वेलची पावडर अॅड करा. नंतर या सर्व मिश्रणाला नीट एकजीव करुन घट्ट असे मिश्रण तयार करुन घ्या.
तयार केलेले काजूचे पीठ एका भांड्यात काढून चांगले मळून घ्या. यानंतर एक ट्रे घेऊन त्याला तूप लावा, मग त्यात काजूचे सर्व मिश्रण टाकून हाताच्या साहाय्याने सपाट पसरवा.
मग त्या मिश्रणाला वरुन सिल्वर वर्क पेपर लावून सुरीच्या साहाय्याने तुकडे करुन घ्या. अशा पद्धतीने आपली काजू कतली तयार झाली आहे.
NEXT: सुनील ग्रोवर कधी काळी कमवायचा 500 रुपये; आज आहे करोडपती