Sakshi Sunil Jadhav
गुरु चाणक्य हे आजच्या पिढीतही उत्तम मार्गदर्शक मानले जातात. त्यांच्या विचारांना अजुनही लोक फॉलो करतात.
बऱ्याचदा अनेकांना चाणक्य निती ही त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते.
तुम्हाला कोणी जर तुमच्या आयुष्यात टिश्यू पेपरसारखं वापरत असेल तर तुम्ही स्वत:ला सावरलं पाहिजे. नाहीतर तुमचं भयंकर नुकसान होऊ शकतं.
काही मित्र किंवा फॅमिलीतले काही लोक तुम्हाला तुमच्या नकळत महत्वाच्या किंवा कधीकधी सगळ्याच कामांसाठी वापर करुन घेतात. पण यामध्ये स्वार्थ असतो का? चला जाणून घेऊयात.
जर काही लोक तुमच्या निर्णयावर तुम्हाला प्रश्न विचारत असतील तर तुम्ही सावध राहिलं पाहिजे.
काहीजण तुमच्या निर्णयावर प्रश्न विचारतात, त्याने तुम्हाला वाटतं हे माझ्या फायद्यासाठी विचारत असतील. पण प्रत्यक्षात तसं नसतं. ते योग्य तुम्हाला मागे खेचण्यासाठी विचारत असतात.
जर काही लोक खूप जास्त कौतुक करत असतील तर ते तुमच्यावर जळत असतात. त्याने तुमच्या नकळत तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
एखाद्या वेळेस प्रश्न विचारल्यावर तुम्हाल कोणी ठरवून अपराधी ठरवत असेल तर ही व्यक्ती तुमच्याशी भूतकाळातल्या उपकारांची आठवण करुन देत असते. असं चाणक्यांचे मत आहे.