Shreya Maskar
कोकणात सणासुदीला आवर्जून ओल्या काजूची खीर बनवली जाते. ही एक स्वीट डिश आहे. ज्याची चव खूप भारी आहे. तसेच ही रेसिपी बनवायला फक्त ५ मिनिटे लागतात.
ओल्या काजूची खीर बनवण्यासाठी ओले काजू, गूळ, ओलं खोबरं, तूप, दूध, वेलची पूड आणि पाणी इत्यादी साहित्य लागते. याचे योग्य प्रमाण घ्या.
ओल्या काजूची खीर बनवण्यासाठी ओले काजू सोलून गरम पाण्यात १५-२० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर पॅनमध्ये साजूक तूप गरम करून त्यात सोललेले ओले काजू चांगले परतून घ्या.
काजूमध्ये थोडे पाणी घालून मिश्रण मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. काजू शिजवताना गॅस मंद आचेवर ठेवा. जेणेकरून काही जळणार नाही.
काजू शिजल्यावर त्यात किसलेला गूळ आणि ओलं खोबरं घालून एकजीव करा. २-३ मिनिटांनी छान सुगंध येऊ लागेल. तुम्ही यात थोडेसे दूध टाका. जेणेकरून मिश्रण छान एकजीव होईल.
शेवटी यात गूळ आणि पाणी टाकून घट्टसर खीर बनवा. त्यानंतर गॅस बंद करून यात वेलची पूड टाका. तुम्ही यात हलके केशर देखील टाकू शकता.
काजू हे प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम आणि झिंकचा उत्तम स्रोत आहे. यामुळे हाडे मजबूत होतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
कोकणची खाद्यसंस्कृती ही नारळ, तांदूळ, कोकम आणि ताज्या माशांचा (सीफूड) वापर करून बनवलेली अस्सल, झणझणीत आणि चविष्ट आहे. यात नारळाचे दूध आणि कोकमाचा आंबटपणा हे कोकणी जेवणाचे वैशिष्ट्य आहे.