जसं जसं आपलं वय वाढतं तसं अनेक आरोग्याच्या समस्याही मागे लागतात. वयस्कर व्यक्तींनीही निरोगी राहण्यासाठी काही प्रकारचे नियम पाळले पाहिजेत. न्यूबर्ग अजय शाह लेबोरेट्रीचे डॉ. अजय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, वय वाढत असताना नियमित पद्धतीने आरोग्य तपासण्या गरजेच्या असतात. ज्यामुळे निरोगी आणि सक्रिय जीवनशैली राखता येईल. ज्येष्ठांसाठी, आजारांचे लवकर निदान आणि प्रतिबंध वय-संबंधित आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी अत्यावश्यक असते.
आपलं आरोग्य योग्य पद्धतीने जपण्यासाठी प्रत्येक वयोवृद्धाने खालील आरोग्य चाचण्यांची माहिती असणं गरजेचं आहे
टाईप 2 मधुमेह वृद्धांमध्ये अधिक सामान्यपणे दिसून येतो. उपाशीपोटी ब्लड शुगर टेस्ट किंवा HbA1c चाचणी ग्लुकोज पातळीचे निरीक्षण करते आणि मधुमेह व्यवस्थापनासाठी मदत करते.
लिपिड प्रोफाइल रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी मोजते. उच्च कोलेस्टेरॉल पातळीमुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे ही चाचणी करणं वाढत्या वयात फायदेशीर ठरू शकते.
उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन हा एक सायलेंट किलर मानला जातो. जो हृदयविकार, स्ट्रोक आणि मूत्रपिंडांच्या समस्या वाढवू शकतो. नियमित रक्तदाब तपासणी केल्यास या स्थितीचे लवकर निदान आणि उपचार करता येतात.
थायरॉईडच्या समस्यांमुळे थकवा, वजन वाढणं किंवा मूडमध्ये बदल होऊ शकतो. थायरॉईड हार्मोन्सची पातळी मोजण्यासाठी एक साधी रक्त चाचणी आवश्यक आहे, जी थायरॉईड समस्यांचं मॅनेजमेंट करण्यात मदत करतं.
नियमित कॅन्सरची टेस्ट केल्यास याचं कर्करोगाचे निदान लवकर करून प्राण वाचवू शकतात. स्तनाच्या कर्करोगासाठी मॅमोग्राफी, कोलोरेक्टल कर्करोगासाठी कोलोनोस्कोपी, आणि प्रोस्टेट कर्करोगासाठी पीएसए चाचण्या करणं योग्य ठरू शकतं.
हाडं कमजोर होऊन ठिसूळ होणं (ऑस्टिओपोरोसिस) ही समस्या विशेषतः महिलांमध्ये सामान्यपणे दिसून येते. हाडांची घनता तपासणी किंवा DEXA स्कॅन हाडांची मजबूती मोजली जाते. विशेषतः ६५ वर्षांवरील महिलांनी दर दोन वर्षांनी ही चाचणी करून घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.