Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana Saam Tv
लाईफस्टाईल

Sukanya Samriddhi Yojana: दररोज फक्त 333 रुपये गुंतवून तुमच्या मुलीचे भविष्य करा सुरक्षित, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Satish Kengar

Sukanya Samriddhi Yojana: तुम्ही तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करायचा विचार करत असाल, तर सरकारी योजना तुमच्यासाठी उत्तम ठरतील. तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता आणि जेव्हा ती 21 वर्षांची होईल, तेव्हा मॅच्युरिटीच्या वेळी तिला 51 लाख रुपयांची मोठी रक्कम मिळू शकते.

सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकार समर्थित अल्प बचत योजना आहे. जी पालकांना त्यांच्या मुलांच्या दीर्घकालीन आर्थिक गरजांसाठी पैसे वाचविण्यात मदत करते.

गुंतवणूकदाराला त्याची मुलगी 14 वर्षांची होईपर्यंत यात गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. गुंतवणूकदाराला त्याची मुलगी 18 वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रकमेच्या 50 टक्के रक्कम आणि ती 21 वर्षांची झाल्यावर पूर्ण मॅच्युरिटी रक्कम काढता येईल. (utility news in marathi)

sukanya samriddhi yojana calculator : सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर

जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच सुकन्या समृद्धी योजना खात्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर तो 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकेल. कारण एसएसवाय (SSY) योजना एखाद्या गुंतवणूकदाराला त्याची मुलगी 14 वर्षांची होईपर्यंत या अल्प बचत योजनेत गुंतवणूक करण्याची परवानगी देते. (Latest Marathi News)

यामुळे गुंतवणूकदाराला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत आयकर लाभांचा दावा करण्याची मुभा मिळते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा 10,000 रुपये (प्रतिदिन 333) गुंतवले तर तो 12 समान हप्त्यांमध्ये दरवर्षी 1.20 लाख रुपये गुंतवू शकतो.

तसेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्याची मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर 50 टक्के मॅच्युरिटी रक्कम घेतली नाही, तर त्याला 51,03,707 रुपये किंवा अंदाजे 51 लाख रुपये मॅच्युरिटी रक्कम मिळू शकेल. या 51 लाख रुपयांमध्ये एखाद्याची एकूण गुंतवणूक 18 लाख रुपये असेल आणि 21 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर मिळणारे व्याज रुपये 33,03,707 किंवा अंदाजे 33 लाख रुपये असेल.

दरम्यान, सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर संपूर्ण कालावधीसाठी 7.6 टक्के असून तो बदलत राहतो. त्यामुळे जर एखाद्या गुंतवणूकदाराने आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच सुकन्या समृद्धी योजना खात्यात दरमहा 10,000 रुपये गुंतवण्यास सुरुवात केली, तर मुलगी वयाच्या 21 व्या वर्षी कोट्याधीश होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Van Hits Children : ट्रकने २९ मुलांना चिरडले, १८ जण गंभीर; कल्चरल फेस्टिवलदरम्यान मोठी दुर्घटना

Abhijeet Patil: माढ्यात माेठ्या राजकीय घडमाेडी, विठ्ठल कारखान्यावरील जप्ती मागे; अभिजीत पाटील करणार भाजपला मदत, Video

Freedom At Midnight Cast Unveiled : निखिल अडवाणी यांच्या 'फ्रिडम ॲट मिडनाइट'चा फर्स्ट लूक आऊट; गांधी- नेहरू आणि पटेल यांच्या भूमिकेत कोण दिसणार ?

Covaxin : कोव्हिशिल्डनंतर आता कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा; वाचा सविस्तर

Sanjay Raut: सांगलीत भाजपचा अधिकृत अन् एक अनधिकृत उमेदवार; संजय राऊतांचा विशाल पाटील यांना टोला

SCROLL FOR NEXT