सध्या चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अनेक दुर्धर आजार आपल्या मागे लागतात. यातीलच एक आजार म्हणजे कॅन्सर. सध्या कॅन्सरचं प्रमाण केवळ देशात नाही तर जगभरात वाढताना दिसतंय. अशातच कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचारांवर एक संशोधन करण्यात आलं आहे. शास्त्रज्ञांनी कॅन्सरच्या एक विशेष उपचार शोधून काढला आहे. ही उपचारांची उलट म्हणजे रिवर्स पद्धत आहे. यामध्ये कॅन्सरच्या पेशी रिवर्स पद्धतीने निरोगी पेशींमध्ये रूपांतरित होतात. शास्त्रज्ञांनी त्याला मॉलिक्युलर स्विच असं नाव दिलंय.
दक्षिण कोरियातील डेजिओनमधील कोरिया अॅडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (KAIST) इथल्या संशोधकांनी केलेल्या या शोधामुळे कॅन्सरच्या नवीन उपचारांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. जीवशास्त्राचे प्राध्यापक प्रोफेसर क्वांग-ह्युन चो यांनी सांगितलं की, त्यांच्या टीमने एक मॉलिक्यूलर स्विच शोधला आहे जो कॅन्सरच्या पेशींना सामान्य पेशींमध्ये बदलू शकतो.
संशोधकांनी सांगितलं की, धोकादायक इन्फेक्शन तेव्हा होतं ज्यावेळी कोणत्या खास वेळी स्थितीत आमूलाग्र बदल होतो. उदाहरण घ्यायचं झालं तर, जेव्हा २१२ फॅरेनहाइटवर केटलमध्ये पाणी उकळल्यावर त्याचं वाफेत रूपांतर होतं तेव्हा एक समजता येणारी घटना घडते.
आणखी एक गंभीर इन्फेक्शन देखील प्रक्रियेतील एका विशिष्ट वेळी घडतं ज्याद्वारे सामान्य पेशी कॅन्सरच्या पेशींमध्ये रूपांतरित होतात. जे अनुवांशिक आणि एपिजेनेटिक दोन्ही बदलांच्या संचयनामुळे होतं. ट्यूमरच्या विकासादरम्यान किंवा ट्यूमरजननेसिस दरम्यान, सामान्य पेशी अस्थिर अवस्थेत प्रवेश करतात ज्यामध्ये सामान्य आणि कॅन्सरच्या पेशी एकत्र राहतात.
सिस्टम बायोलॉजी वापरून आपण पेशींमध्ये होत असलेल्या बदलांचं परीक्षण करू शकतो. कॅन्सरच्या विकासावर नियंत्रण ठेवणाऱ्या अनुवांशिक नेटवर्कच्या मॉडेलचा अंदाज घेण्यासाठी टीमने एक प्रणाली तयार केली. ती प्रक्रिया रिवर्स करू शकणारा मॉलिक्यूलर स्विच शोधण्यासाठी वापरली.
मुळात पेशी कॅन्सरच्या ट्यूमरमध्ये कधी बदलतात हे स्पष्ट करणारं हे पहिलेच संशोधन आहे. जे स्वतःमध्ये एक अद्वितीय प्रकारचा बदल आहे. संशोधकांचा असा अंदाज आहे की, भविष्यात उपचारांची ही पद्धत कॅन्सरच्या पेशी रिवर्स करण्यासाठी म्हणजेच त्यांना सामान्य स्थितीत आणण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.