Weight loss saam tv
लाईफस्टाईल

Weight Loss : जीम, डाएट सोडा... फक्त पाणी पिऊन कमी करू शकता वजन; पाहा कसं

Weight Loss : तुम्हालाही वजन कमी करायचंय तर आम्ही तुम्हाला एक सोपा मार्ग सांगणार आहोत. तुम्ही पाणी पिऊन देखील तुमचं वजन कमी करू शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यांच्यामुळे वजन वाढीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. यामुळे वजन कमी करण्यासाठी कोणी डाएट, कोणी जीम तर कोणी योगाचा मार्ग अवलंबतात. मात्र तरीही तुमच्या मनाप्रमाणे अनेकदा वजन कमी होत नाही. जर तुम्हालाही वजन कमी करायचंय खास करून तुमच्या पोटाचा घेर कमी कराचाय तर आम्ही तुम्हाला एक सोपा मार्ग सांगणार आहोत.

तुम्हाला माहितीये का की तुम्ही पाणी पिऊन देखील तुमचं वजन कमी करू शकतं. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. पाणी पिऊन तुम्ही तुमचं बेली फॅट कमी करू शकता. मात्र यामध्ये केवळ तुम्हाला योग्य पद्धतीने पाणी प्यावं लागणार आहे.

रिसर्च काय सांगतो?

नुकत्याच केलेल्या रिसर्चनुसार ही बाब समोर आली आहे. ज्यामध्ये तुम्ही केवळ पाणी पिऊन वजन घटवू शकता. या संशोधनात नमूद केल्यानुसार, जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायलात तर तुमचं वजन कमी होऊ लागेल.

नॅशनल लायब्ररी ऑफ सायन्सचा रिसर्च

नॅशनल लायब्ररी ऑफ सायन्सने हा रिसर्च केला आहे. या रिसर्चनुसार, 30 ते 59 टक्के अमेरिकेतील तरूण जे वजन कमी करतात ते केवळ पाणी पिण्यावर भर देतात. याचाच अर्थ तुम्ही केवळ पाणी पिऊन देखील वजन कमी करू शकता.

काय सांगतो रिसर्च

या रिसर्चमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, अधिक प्रमाणात पाणी प्यायल्याने वजन मेंटेन करण्यास मदत होते. हे संशोधन केलेल्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पाणी प्यायल्यानंतर काही मिनिटांच्या आत 24-30 टक्के कॅलरी बर्न होण्यास वाढ होते.

थंड पाणी ठरतं अधिक फायदेशीर?

थंड पाणी प्यायल्याने वजन कमी होतं, असा अनेकांचा समज आहे. मात्र हा समज काहीसा खरा असल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये अजून एका रिसर्चनुसार, जास्त वजन असलेल्या मुलांनी थंड पाणी प्यायल्यावर त्यांच्यातील कॅलरी बर्न झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी थंड पाणी फायदेशीर ठरतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंधेरी सबवे मागील तीन तासापासून वाहतुकीसाठी बंद

Screen time effects on kids: वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय चिडचिडेपणाची समस्या; कसं कराल स्क्रीन टाईम मॅनेजमेंट?

Maharaja Palace History: शाही घराण्याचा गौरव, सांस्कृतिक वारसा असलेल्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक पॅलेसची माहिती

अरबी समुद्रात वाऱ्याने दिशा बदलली, मुंबईत पावसाचं रौद्ररूप, IMD कडून रेड अलर्ट, शाळाही बंद

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT