Panchang today in Marathi saam tv
लाईफस्टाईल

Panchang Today: शनिवारचा योग फलदायी! माघ शुक्ल चतुर्दशीचं पंचांग, शुभ मुहूर्त आणि राशीफल

Magha Shukla Chaturdashi Panchang: आज माघ शुक्ल चतुर्दशी असून शनिवारी आलेल्या या दिवशी विशेष योग निर्माण झालेत. पंचांगानुसार, हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

आज ३१ जानेवारी २०२६ माघ शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी आणि शनिवार आहे. शनिवारी उपवास केल्याने दुःख आणि आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते असं मानण्यात येतं. यादिवशी शनि चालीसा पठण करा आणि गरजूंना दान करा. या दिवशी काळे कपडे, काळे तीळ आणि अन्न दान केल्यानेही शनिदेव प्रसन्न होतात.

माघ महिना दानधर्मासाठी खूप फलदायी आहे आणि विशेषतः शनिवारी केलेलं दान आर्थिक, फायद्याचं असतं. आजच्या दिवसाचे कोणते शुभ मुहुर्त आहेत आणि पंचांग पाहूयात.

आजचं पंचांग

  • तिथी: शुक्ल त्रयोदशी

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • वार: शनिवार

  • नक्षत्र: पुनर्वसु

  • योग: विष्कुंभ (दुपारी 01:33:40 पर्यंत)

  • करण: तैतिल

  • चंद्र राशि: मिथुन

  • ऋतु: शिशिर

सूर्य आणि चंद्र गणना

  • सूर्योदय: 07:08:01 AM

  • सूर्यास्त: 06:13:57 PM

  • चंद्रोदय: 04:36:51 PM

  • चंद्रास्त: 05:45:44 AM

हिंदू कालगणना

  • शक संवत: 1947

  • विक्रम संवत: 2082

  • मास (अमान्ता): माघ

  • मास (पुर्णिमान्ता): माघ

आजचे शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त

12:18:00 PM ते 01:02:00 PM

आजचे अशुभ मुहूर्त

राहु काल: 09:54:29 AM ते 11:17:44 AM

यमघंट काल: 02:04:13 PM ते 03:27:28 PM

गुलिकाल: 07:08:00 AM ते 08:31:14 AM

कोणत्या राशींचा ठरणार आजचा दिवस उत्तम

मिथुन रास

आज चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे विचारशक्ती तीव्र राहणार आहे. संवाद, लेखन, चर्चा किंवा महत्त्वाच्या भेटींमधून सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. नवीन कल्पनांना योग्य दिशा मिळणार आहे.

तूळ रास

नातेसंबंधात समतोल राखता येणार आहे. सहकार्य आणि समजूतदारपणा वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी सौम्य पण प्रभावी निर्णय घेतल्यास फायदा होऊ शकतो.

कुंभ रास

आज वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची संधी मिळणार आहे. सामाजिक कामात यश मिळू शकतं. मित्रांकडून किंवा सहकाऱ्यांकडून मदत मिळेल.

वृषभ रास

आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवणार आहे. खर्च आणि उत्पन्न यामध्ये समतोल राखता येणार आहे. संयमाने घेतलेले निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरू शकणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार; पार्थ पवार खासदार होणार?

Mahashivratri 2026 Date: महाशिवरात्रीचा उपवास कोणत्या दिवशी धरावा? पाहा तिथी आणि शुभ मुहूर्त

Pune Crime : 'तुझा बाबा सिद्धीकी करू' पुण्यातील प्रसिद्ध गोल्डन मॅनला लॉरेन्स बिश्नोईची धमकी

Yellow drink reduce cholesterol: हे एक पिवळं ड्रिंक करेल हाय कोलेस्ट्रॉल झटक्यात कमी; पोटाची चरबी लगेच वितळेल

SCROLL FOR NEXT