Hanuman Jayanti 2025: यंदाच्या वर्षी हनुमान जयंतीला भद्राची सावली; नोट करून घ्या पुजेचं साहित्य, मुहूर्त आणि मंत्र

Hanuman Janmotsav 2025 Date & Time: पंचांगानुसार यंदा हनुमान जयंतीच्या दिवशी भद्राची छाया राहणार आहे. त्यामुळे यावर्षीची हनुमान जयंती विशेष ठरणार आहे. या दिवशी पूजन करताना योग्य तिथी, विधी, मुहूर्त आणि पूजेचं साहित्य काय असावं, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल.
Hanuman Jayanti 2025
Hanuman Jayanti 2025saam tv
Published On

दरवर्षी चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. या दिवशी भक्त हनुमानजींची जयंती भक्ती मोठ्या श्रद्धेने केली जाते. ठिकठिकाणच्या मंदिरात जाऊन भक्त हनुमानाचं दर्शन घेतात. पौराणिक मान्यतेनुसार, हनुमानजींना रुद्राचा अवतार मानण्यात येतं. याशिवाय कलियुगात ते अमर स्वरूपात अस्तित्वात असल्याचीही मान्यता आहे. ते आपल्या भक्तांचा त्रास दूर करत असल्याने त्यांना संकटमोचन असंही म्हणतात.

हनुमानजींच्या महान शक्तीचा पुरावा म्हणजे त्यांनी सीता मातेचा शोध लावला होता. त्याचप्रमाणे संकटकाळी त्यांनी लक्ष्मणाचे प्राण वाचवले. पंचांगानुसार, या वर्षी हनुमान जयंतीलाही भद्राची सावली असणार आहे. अशा परिस्थितीत, हनुमान जयंतीची तारीख, पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त आणि आवश्यक असलेलं पूजेचं साहित्य जाणून घेणं गरजेचं आहे.

हनुमान जयंतीची तिथी

  • चैत्र पौर्णिमा तिथी १२ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ०३:२१ वाजता सुरू होईल.

  • पौर्णिमा तिथी १३ एप्रिल २०२५ सकाळी ०५:५१ वाजता संपणार आहे.

Hanuman Jayanti 2025
हनुमान जयंतीच्या दिवशी चुकूनही 'ही' कामं करू नये

हनुमान जयंतीचे शुभ मुहूर्त

  • ब्रह्म मुहूर्त - पहाटे ०४:२९ ते ०५:१४ पर्यंत

  • अभिजीत मुहूर्त - सकाळी 11:56 ते दुपारी 12:48 पर्यंत

  • विजय मुहूर्त - दुपारी 02:30 ते दुपारी 03:21 पर्यंत

भद्राची वेळ काय आहे?

भद्रा वेळ सकाळी ०५:५९ वाजता सुरू होणार आहे आणि संध्याकाळी ४:३५ वाजता संपणार आहे.

हनुमान जयंतीच्या पुजेसाठी लागणारं साहित्य

हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो, लाल कापड आणि कंबरेचं कापड, लाल रंगाची फुलं आणि माळ, धूप, अक्षता, चंदन, दिवा (माती/पितळ), गाईचं तूप, चमेलीचं तेल, सुपारीची पानं, सुपारी, लवंग, वेलची, विडा, कुंकू, हनुमानजींचा ध्वज, पवित्र धागा, चरण पादुका, हनुमान चालीसा पुस्तक, शंख, घंटा, नैवेद्य.

Hanuman Jayanti 2025
Shukra Margi: 13 एप्रिलपासून चमकणार 'या' राशींचं भविष्य; शुक्राच्या मार्गी चालीने घरात येणार छप्परफाड पैसा

पुजा करण्याचा मंत्र कोणता?

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥

महाबलाय वीराय चिरंजीविन उद्दते

हारिणे वज्रदेहाय चोलंघितमहाव्यये॥

ॐ ह्रां ह्रीं ह्रं ह्रैं ह्रौं ह्रः हं

हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्॥

Hanuman Jayanti 2025
Shukra Margi: 3 दिवसांनी शुक्र 'या' राशींवर पाडणार पैशांचा पाऊस; मीन राशीत मार्गी होऊ मिळणार आर्थिक फायदा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com