Surabhi Jayashree Jagdish
दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो.
यंदाच्या वर्षी हनुमान जन्मोत्सव 12 एप्रिल 2025 म्हणजेच शनिवारी आहे
हनुमान जयंतीच्या दिवशी काय करू नये हे जाणून घेऊया
हनुमानजींच्या पूजेमध्ये चरणामृत कधीही वापरू नये.
बजरंगबलीची पूजा करताना पांढरे किंवा काळे कपडे घालू नयेत. हनुमानजींची पूजा करताना लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.
हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाची तुटलेली किंवा खंडित मूर्ती पूजेसाठी वापरू नये.
हनुमान जयंतीच्या दिवशी मीठ खाणं टाळावं.
हनुमान जयंतीच्या दिवशी घराच्या दारात येणाऱ्या लोकांचा अपमान करू नये.