Samsung Galaxy M14 5G
Samsung Galaxy M14 5G Saam Tv
लाईफस्टाईल

Samsung Galaxy M14 5G : दमदार फीचर्ससह कमी किंमतीत लॉन्च झाला Samsung Galaxy M14 5G, जाणून घ्या किमत

कोमल दामुद्रे

Samsung Galaxy M14 5G Price : कोरियन कंपनी सॅमसंगने आज भारतात 5G चा स्वस्त फोन लॉन्च केला आहे. तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट Amazon द्वारे मोबाईल फोन खरेदी करू शकाल. बाजारात तो 21 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापारून हा सेल सुरू होईल.

यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचा डिस्प्ले, कॅमेरा (Camera), बॅटरी व किमत किती आहे हे जाणून घ्या

1. Samsung Galaxy M14 5G चा डिस्प्ले

या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाची HD+ डिस्प्ले स्क्रीन आहे, जी 90 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा फोन दोन रॅम व्हेरियंटमध्ये खरेदी (Shopping) करता येईल. यापैकी एक 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट आहे. तर दुसरे मॉडेल 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येते.

2. Samsung Galaxy M14 5G चा कॅमेरा

या फोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा (Camera) सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा आहे, जो f/1.8 अपर्चर सह येतो. याशिवाय 2MP डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल मायक्रो लेन्स देखील उपलब्ध आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये (Phone) 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

3. Samsung Galaxy M14 5G बॅटरी

या नवीन सॅमसंग स्मार्टफोनमध्ये मोठी 6000 mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याची बॅटरी टाइप-सी यूएसबी चार्जरने चार्ज करता येते. या फोनची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 2 दिवस चालेल असा कंपनीचा दावा आहे. हा फोन ड्युअल बँड वायफाय, 5G, 4G, ब्लूटूथ, NFC, GPS कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.

4. Samsung Galaxy M14 5G किंमत

Samsung Galaxy M14 5G ची किंमत 13,490 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत 4GB रॅम व्हेरिएंटसाठी आहे. त्याच वेळी, त्याच्या 6GB रॅम वेरिएंटची किंमत 14,990 रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री 21 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता Amazon वर सुरू होईल. तुम्ही सॅमसंगच्या वेबसाइटवरूनही ते खरेदी करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship : वारंवार पार्टनरला मॅसेज केल्यास नात्यात येईल दुरावा; चुकूनही 'या' चुका करू नका

Maval Constituency : मावळ मतदारसंघातील मतदारांच्या अपेक्षांचा भंग, वर्षानुवर्ष सागरी पूल राहिला कागदावरच

Online Payment: 'या' टीप्स वापरा करा तुमचे UPI खातं सुरक्षित

Beed Crime: बीडमध्ये तब्बल २ कोटींचे चंदन जप्त; शरद पवार गटाच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

Today's Marathi News Live : राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करू; पुण्यातील भाजप नेत्याला फोनवरून धमकी

SCROLL FOR NEXT